वाट पाहुनी जीव शिनला, दिसा मागुनी दिस टळला गीताचे सातारकरांना करून दिली आठवण,,,,,,
अजित जगताप - Thu 10th Aug 2023 09:56 pm
- बातमी शेयर करा
सातारा : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्यातील सुपुत्र नामदार एकनाथ शिंदे यांचे गुरुवार दि: १० ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेचार वाजता अचानक सातारा शहर दौरा निश्चित केला. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सातारा सैनिक स्कूल येथे येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासन व पालकमंत्री शंभूराजे देसाई यांना मिळाली. त्यामुळे सर्वजण आतुरतेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय हेलिकॉप्टरची वाट पाहत होते. यावेळी वाट पाहून जीवनाला दिसा मागून दिस टळला,,,, या मराठी गीताची आठवण उपस्थितांना झाली. याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र शासनाच्या हेलिकॉप्टरने येणारे असल्याची अधिकृत माहिती मिळताच सातारा शासकीय विश्रामगृह मध्ये उपस्थित असलेले सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई , आ.मकरंद पाटील,जिल्हा अधिकारी जितेंद्र डूडी ,जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारे, सातारा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी अभिजीत बापट, माहिती अधिकारी हेमंत चव्हाण, पवार व शिवसेनेचे सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांच्यासह पत्रकार मित्र सुद्धा हजर होते. सुमारे शंभर- दीडशे अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते. पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. हेलिपॅड नजिक वाट पाहत एकामेकांच्या औपचारिक चर्चेत सर्वजण सामील झाले होते.मात्र ,पालकमंत्र्यांचे सर्व लक्ष आभाळाकडे लागले होते. कधी एकदा हेलिकॉप्टरचा आवाज येतोय. असं त्यांना झाले होते .आणि सुमारे वीस मिनिटांच्या कालावधीनंतर हेलिकॉप्टरचा आवाज आला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव पसरले. दहा मिनिटात हेलिकॉप्टर सैनिक स्कूलच्या हेलीपॅडवर स्थिरावले. त्यानंतर प्रोटोकॉल नुसार स्वागत समारंभ व सलामी देण्यात आली. या वेळेला साधी माणसं या चित्रपटातील गीतकार योगेश व आनंदघन यांनी संगीत दिलेले,,,,,, ''''''''''''वाट पाहून जीव शिनला,,,,,,, दिसा मागून दिस टळला ,,,,,,,,,सुर्या आला तळपूनी गेला, मावळतीच्या खळी गालाला गडनी, सखे गडणी ,,,या गीताची मात्र वयस्क अधिकारी व कार्यकर्त्यांना आठवण व्हावी अशा पद्धतीने पालकमंत्री शंभूराज देसाई यांची आकाशाकडे नजर लागल्याची क्षणचित्रे कॅमेर्याने कॅमेरा बंद केली आहेत .

,_____________________________________ फोटो --- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टर कडे लक्ष ठेवून असलेले पालकमंत्री शंभूराजे देसाई (छाया- अजित जगताप सातारा)
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 10th Aug 2023 09:56 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 10th Aug 2023 09:56 pm













