उदयनराजे यांचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी खिंडवाडी येथील बाजार समितीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उधळला

सातारा  : खासदार उदयनराजे आणि आमदार शिवाजी राजे यांच्यातील वाद हा सातारकरांना नवीन नाही आज खिंडवाडी येथे शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत बाजार समितीच्या इमारतीचे उद्घाटन आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केले होते परंतु त्या अगोदरच खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते आणि काही ग्रामस्थांच्या मदतीने तेथील उद्घाटनांच्या साहित्याची मोडतोड करण्यात आलेली आहे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत आज खिंडवाडी (कणसे ढाब्या शेजारी) येथे सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुतन इमारतीचे भुमीपुजन दहा वाजता होणार आहे. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु होती या कार्यक्रमानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे.

या कार्यक्रमापुर्वी काही ग्रामस्थांनी येथे पाेहचून तेथील साहित्य फेकून दिले. तसेच एक कंटेनर पलटी केला. खासदार उदयनराजे भोसले हे त्यावेळी घटनास्थळी हाेते. या घटनेमुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे आणि खासदार उदयनराजे यांच्यात पुन्हा एकदा वाद उकळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सातारा बाजार समितीत  आ. शिवेंद्रराजे गटाची सत्ता आल्यानंतर निवडणुकीत दिलेली आश्वासनपूर्ती करण्यासाठी खिंडवाडी येथे साडेपंधरा एकरवर नवीन बाजार समितीची इमारत उभी करण्यात येत आहे. त्याचा भूमिपूजन समारंभ आज बुधवारी दि. 21 रोजी सकाळी 10 वाजता आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. त्यासाठी खिंडवाडी येथे जय्यत तयारी सुरु असताना खा. छ. उदयनराजे भोसले स्वतः दाखल झाले आहेत.
छत्रपती उदयनराजे भोसले आणि पोलिसांच्यात चर्चा सुरू आहे. सदरील जागा माझी असून मालक मी आहे. त्यामुळे माझे शेड मी तोडले तेव्हा तुम्हांला काय प्राॅब्लेम आहे. माझ्या जागेत शेड म्हणजे ते माझेच आहे. माझ्या जागेत एखाद्याने काही केले तर ती वस्तू कायद्याने माझीच होणार आहे, असे छ. उदयनराजे यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे आता हा वाद वाढणार की मिटणार याकडे सातारावासियांचे लक्ष आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त