सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातील दीपक केसरकरांनी सांगितले 3 मोठे मुद्द
आज पत्रक काढून भूमिका जाहीर करुSatara News Team
- Mon 27th Jun 2022 04:34 am
- बातमी शेयर करा
वरिष्ठ वकील बाजू मांडणार शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे मांडणार आहेत. तर सरकारकडून सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता 16 आमदारांवर कारवाई होणार की, बंडखोर नेत्यांच्या बाजूने न्यायालय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा न्यूज मुंबई :- महाराष्ट्रातील राजकीय राडा आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलाय. त्यामुळे एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आलीय.त्याबाबत आज सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी शिंदे गटातील दीपक केसरकरांनी 3 मोठे मुद्दे सांगितले आहेत. “सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल, आज पत्रक काढून भूमिका जाहीर करु”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
????1. जिंकणार आम्ही, पण हरलोच तर गट स्थापन करावा लागेल
एकनाथ शिंदे गटासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 16 आमदारांच्या निलंबन नोटिसीविरोधात एकनाथ शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. त्याबाबत आज सुनावणी पार होणार आहे. पण त्याआधी दीपक केसरकर यांनी मोठं विधान केलं आहे. “सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल”, असं दीपक केसरकर म्हणाले आहेत.
????2. पालिका निवडणुकांसाठीचा संघर्ष नको म्हणून बंडखोरी
सध्या महापालिकांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी बोलताना सांगितले.तेव्हा येत्या पालिका निवडणुकांसाठीचा संघर्ष नको म्हणून बंडखोरी केल्याचं त्यांनी सांगितलं.
????3. आज पत्रक काढून भूमिका जाहीर करणार
“आमच्याकडे बहुमत आहे. आम्हीच खरी शिवसेना आहोत. त्यामुळे सुप्रीम कोर्टात जिंकणार तर आम्हीच, पण हरलो गट स्थापन करावा लागेल. आज पत्रक काढून आम्ही आमची भूमिका जाहीर करु”, असं केसरकर म्हणालेत.
वरिष्ठ वकील बाजू मांडणार
शिंदे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्यानंतर शिंदे गटाची बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे मांडणार आहेत. तर सरकारकडून सुप्रसिद्ध वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. त्यामुळे आता 16 आमदारांवर कारवाई होणार की, बंडखोर नेत्यांच्या बाजूने न्यायालय निर्णय देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
eknathshindwe
dipakkesarkar
suprimcort
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Mon 27th Jun 2022 04:34 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Mon 27th Jun 2022 04:34 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Mon 27th Jun 2022 04:34 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Mon 27th Jun 2022 04:34 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Mon 27th Jun 2022 04:34 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Mon 27th Jun 2022 04:34 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Mon 27th Jun 2022 04:34 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Mon 27th Jun 2022 04:34 am













