सामाजिक कार्यातील उगवते नेतृत्व ; सपना भोसले

सातारा न्यूज : रयत स्वाभिमानी संघटनेच्या युवती आघाडीच्या सातारा जिल्हाध्यक्ष व श्रवण फाउंडेशन अंतर्गत मोकळा श्वास महिला विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. सपना सचिन भोसले यांचा सोमवार दि. 16 सप्टेंबर रोजी वाढदिवस. रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजकार्यातील या उगवत्या नेतृत्वाचा संक्षिप्त परिचय.....              

          रोक सका है कौन उसे,    

   जिसने बस चलनाही सिखा ॥    

     मिटा सका है कौन उसे,

       जिसने बस जीना ही सिखा ॥      

 या काव्यपंक्ती ज्यांच्या जीवन प्रवासास समर्पकपणे लागू होतात, असे सामाजिक क्षेत्रातील उगवते नेतृत्व म्हणजे सौ. सपना भोसले. खंडाळा तालुक्यातील अजनूज हे त्यांचे मूळचे गाव, मात्र नोकरी- व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्या आई-वडिलांनी महानगरी मुंबईमध्ये वास्तव्य केले. दि. 16 ऑक्टोबर 1990 रोजी राजधानी मुंबईमध्येच त्यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण बालपण चेंबूरमध्ये व्यतीत झाले. अर्थात मुंबईकर असले तरी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला गावाचीही तितकीच ओढ होती, गावच्या मायपांढरीशी त्यांची नाळ जोडलेली होतीच. गावाकडील संस्कार शिदोरी आणि मुंबईतील गतिमान कार्यशैली यांचा समन्वय सपना मॅडम यांच्या जीवनात दिसून येतो. बालपणापासूनच चौकस आणि बोलकी मुलगी ही त्यांची खासियत आहे तसेच चांगल्याला चांगले आणि वाईटाला वाईट म्हणण्याचा स्पष्टवक्तेपणाही विद्यार्थी दशेपासून त्यांच्याकडे आहे चेंबूरच्या महाराष्ट्र ऐक्यवर्धक संस्थेत प्राथमिक शिक्षण घेतल्यावर लोकमान्य टिळक विद्यापीठातून त्यांनी बीएची पदवी संपादन केली. सन २००७ मध्ये त्यांचा विवाह झाला व  खंडाळा तालुक्यातील केसुर्डीमध्ये त्यांचे आगमन झाले. अर्थात नव्याची नवलाई आणि नवा जीवन प्रवास सुरू करतानाही  मृदू स्वभाव आणि धाडसीपणा यांचा सुरेख संगम त्यांच्या आयुष्यात दिसून येतो. सुरुवातीच्या काळात त्यांनी घरातील शेतीमध्येही हातभार लावला. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांनी घरातल्यांना सुचवले अर्थात त्यातून निश्चितच कुटुंबाला फायदा झाला. त्यानंतर प्रापंचिक व्याप सांभाळत असतानाच त्यांनी पार्लरचा कोर्स केला व महिलांना नीटनेटके राहणे व सौंदर्यवृद्धी करण्यासाठी नेमक्या टिप्स दिल्या वास्तविक ब्युटी पार्लरचे काम म्हणजे खूपच कष्टाचे आणि सतत व्यस्त रहावे लागणारे असले तरी त्या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न, अडचणी त्यांना समजून घेतल्या. मूळच्या संवेदनशील स्वभावाच्या सपना मॅडम यांनी त्यातून महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी काय करावे लागेल, याबाबतचा विचार करण्यास सुरुवात केली. त्यातूनच बचत गट उभारणे, समुपदेशन, महिलांसाठीचे लहान-मोठे व्यवसाय मार्गदर्शन यामध्ये त्यांना आवड निर्माण झाली. यादरम्यान सौ. नूजत इनामदार यांच्याशी त्यांची चांगलीच मैत्री झाली व विचारधारा जुळत असल्याने सुखदुःखाच्या अनेक बाबी त्या मनमोकळेपणाने एकमेकींशी बोलू लागल्या. त्यातूनच इतर महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्या धडपडू लागल्या.

 महिला सक्षमीकरणासाठी काय करावे लागेल यासाठी केवळ विचार न करता प्रत्यक्ष कृती करण्याकडे त्यांनी लक्ष दिले. मूळच्याच धाडसी व कणखर स्वभावामुळे विविध क्षेत्रात महिलांना पुढे आणण्यासाठी काय करावे लागेल यासाठी त्या प्रयत्नशील राहिल्या.          नूजत इनामदार यांच्यासोबत तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तेथील ग्रामपंचायतींच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी विविध कोर्सेसची अंमलबजावणी करण्यात सपना मॅडम यांनी पुढाकार घेतला.  या कोर्सेस द्वारे गावोगावच्या महिलांना विविध व्यवसायांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम ही सपना मॅडम यांनी केले आहे. दरम्यान खंडाळ्यातील एका हॉस्पिटलमध्ये त्या कार्यरत होत्या. लॉकडाऊनच्या काळात कंपनीतही नोकरी केली मात्र "जिथे जाईन तिथे आपल्या कामाचा ठसा उमटवेन" ही वृत्ती असल्याने त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपले वेगळेपण सिद्ध केले. मात्र रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली समाजसेवेत कार्यरत झाल्यापासून सपना मॅडम यांच्या कार्यास आणखी झळाळी प्राप्त झाली आहे. सागरदादांच्या मार्गदर्शनातून समाजसेवेचा एक नवा प्रवास त्या करत आहेत. रयत स्वाभिमानी संघटनेत सुरुवातीला युवती आघाडीच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष म्हणून त्यांना संधी देण्यात आली. मात्र उत्कृष्ट कामकाजाच्या माध्यमातून त्यांनी संघटनेत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन सागरदादांनी त्यांना युवती आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. या पदालाही त्यांनी न्याय दिला व स्वतःबरोबरच संघटनेचे नावही उज्वल केले. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी महिला नेतृत्व समयोचित ठरते म्हणून सागर दादांच्या नेतृत्वाखालील श्रवण फाउंडेशनशी संलग्न असलेल्या मोकळा श्वास महिला विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्याकडे देण्यात आली.

 

नोकरी व कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असतानाच "मोकळा श्वास" च्या माध्यमातूनही महिलांसाठी सपना मॅडम यांनी केलेले कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे. केवळ महिला मुली युवती यांच्यासाठीच नव्हे तर समाजाच्या सर्वच घटकांसाठी तळमळीने काम करणारे उगवते नेतृत्व अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा शिबिर, मोतीबिंदू शिबिर, मोफत चष्मे वाटप कार्यक्रम, संपूर्ण आरोग्य तपासणी शिबिर यांचे ठिकठिकाणी आयोजन करण्यात सपना भोसले यांनी घेतलेला पुढाकार त्यांच्यातील आदर्श समाजसेविकेचे द्योतक आहे. संपूर्ण समाज मोतीबिंदू मुक्त आणि नेत्र विकार मुक्त करण्याच्या प्रदेशाध्यक्ष सागर दादांच्या संकल्प ची पूर्तता करण्यासाठी सपना मॅडम सतत कार्यरत असतात ठिकठिकाणी नेत्र शिबिरे आयोजित करण्यासाठी त्या प्रयत्नशील असतात अर्थात आपल्यातील सुप्त नेतृत्वगुणांचा विकास रयत स्वाभिमानी संघटनेच्या माध्यमातून आणि सागरदादांच्या आशीर्वादाने झाला हे त्या आपल्या भाषणांमध्ये जाहीरपणे सांगतात, यातूनच त्यांची संघटनेसह प्रदेशाध्यक्षांवर असलेल्या निष्ठेची प्रचिती येते. आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असलेल्या एका महिला नेतृत्वाला सक्षम करण्यात आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना पैलू पाडण्यात रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागरदादा पवार यांना मिळालेले यश खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. भविष्यातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून महिलांसह समाजातील सर्वच घटकांचे प्रश्न सोडवण्याचा निर्धार युवती आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व मोकळा श्वास च्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्ष म्हणून सपना मॅडम यांनी केला आहे. अर्थात महिलांच्या कोणत्याही समस्या त्यांच्याकडे घेऊन गेल्यावर त्यावर त्या हमखास मार्ग काढतात. आणि एक महिलाच महिलांच्या समस्या समजून घेऊन त्यावर न्याय मिळवून देऊ शकते याची खात्री असल्याने सपना मॅडम यांचे नेतृत्व निश्चितच भविष्यातील आशास्थान आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. रयत स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व श्रवण फाउंडेशनचे संस्थापक सागरदादा पवार यांच्या कल्पक व धाडसी नेतृत्वाखाली सपना मॅडम यांचे कार्य अधिकाधिक उज्वल व्हावे, याच त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. रयत स्वाभिमानी संघटना व श्रवण फाउंडेशन संलग्न मोकळा श्वास महिला विकास संस्थेचा झेंडा अधिक डौलाने फडकवण्यासाठी सपना भोसले यांचे नेतृत्व अधिकाधिक भरत जावो व त्यांना आरोग्यमय दीर्घायुष्य लाभो याच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला