मलवडी येथील खंडोबा देवाचा 1 डिसेंबरला रथोत्सव..
Satara News Team
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
- बातमी शेयर करा
आंधळी : मलवडी येथील श्री खंडोबा व माता म्हाळसा देवीचा रथोत्सव मोक्षदा एकादशी दिवशी सोमवारी 1 डिसेंबर रोजी होत असून या रथ उत्सवाचे मिरवणूक दु. 12.30 वाजता देवळातून देव मानकरी यांच्याकडून रथामध्ये आल्यानंतर प. पु. श्री महंत शांतिगिरीजी महाराज व ग्रामविकास पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते रथ पूजन करून रथोत्सवास सुरुवात करण्यात येणार आहे.
श्री.खंडोबाच्या वार्षिक यात्रोत्सवास हळदी सोहळ्याने सुरुवात झाली.श्री. खंडोबा व माता म्हाळसा देवी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला असून यानिमित्त मंदीर व परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री साडे नऊ वाजता तुतारी, सनई-चौघडे व वाद्यवृंदाच्या साथीने सर्व मान्यवर मंडळी वाजतगाजत श्रीं चा बस्ता बांधण्यासाठी सदाशिव मुळे यांच्या कापड दुकानात गेले. यावेळी श्रीं खंडोबा व माता म्हाळसा देवी यांच्यासाठी उत्तम प्रतीची वस्त्रे घेण्यात आली. श्रींचा बस्ता घेवून सर्वजण परत मंदिरात आले. पुजार्यांनी विधीवत श्री.खंडोबा व माता म्हाळसा यांना नवीन पोशाख चढविला.
श्रींच्या लग्नसोहळ्यासाठी मलवडीसह पंचक्रोशीतून आलेल्या महिला व पुरुष भक्तांनी संपूर्ण मंदीर परिसर फुलून गेला होता. यावेळी सर्वांना अक्षता वाटण्यात आल्या. रात्री साडेदहा वाजता लग्नाच्या धार्मिक विधीला ब्राम्हण व जंगम यांनी सुरुवात केली. रात्री ठिक ११:१५ मिनिटांनी श्रीं च्या विवाह सोहळ्यास सुरुवात झाली. येथील श्री खंडोबा मंदिरात मुख्य गाभारा व त्या बाहेरील मंडपाच्या उजव्या बाजूला अशा दोन ठिकाणी श्रीं च्या मुर्ती आहेत. त्यामुळे एक लग्न ब्राम्हण व एक लग्न जंगम अशी दोनवेळा लग्न लावली जातात. अतिशय भक्तीपुर्ण व उत्साही वातावरणात श्रीं चा विवाह सोहळा रात्री पावणे बाराच्या सुमारास संपन्न झाला.
त्यानंतर फटाक्यांची दणकेबाज व नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात आली. यानंतर देवस्थानकडून परंपरेनुसार धुपारतीचे मानकरी, ब्राम्हण, जंगम, माळी (खांदेकरी), फुल माळी, कुंभार, कासार, लोहार, सुतार, नाईक, गडशी, जिनकर, मातंग, पुजारी, वाजंत्री, वाघे, मैराळ, नाभिक, परीट आदी विविध मानकर्यांना मानाची रक्कम देण्यात आली.
श्री खंडोबाचा वार्षिक रथोत्सव सोमवारी 1 डिसेंबर रोजी आहे. यंदा यात्रा मोठ्या प्रमाणात भरण्याची शक्यता असून आतापासूनच मेवा-मिठाईची दुकाने, खेळण्याची दुकाने तसेच मोठ्या पाळण्यांनी मलवडी गजबजून गेली आहे.
भरीत रोडग्याचा महाप्रसाद
स्थानिक बातम्या
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
संपूर्ण सातारा जिल्हा परिषद 65 गटा मध्ये फायनल अपडेट
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
CPF FRIENDS COMMANDO FORCE FOUNDATION महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षपदी तात्याबा वाघमोडे यांची नियुक्ती
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
डॉ. सूर्यकांत दोशी यांची फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक साठी व्यापारी व जैन बांधवांकडून आग्रही मागणी
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
- Fri 28th Nov 2025 03:00 pm
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 28th Nov 2025 03:00 pm












