सेवागिरी यात्रेत प्रशासनाने योग्यरित्या नियोजन करावे — आमदार महेश शिंदे
रथोत्सव व यात्रा नियोजनाची प्रशासकीय आढावा बैठकगणेश घाडगे
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
- बातमी शेयर करा
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह विविध राज्यांतून लाखो भाविक तीर्थक्षेत्र पुसेगाव येथे येतात. यात्रेच्या काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आरओ पाणी, आरोग्य सेवा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, पार्किंग यांसह सर्व सुविधा सुयोग्यरित्या उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश आमदार महेश शिंदे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
श्री सेवागिरी महाराजांच्या ७८ व्या पुण्यस्मरणानिमित्त होणाऱ्या रथोत्सव व यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित प्रशासकीय बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सातारा आमदार शशिकांत शिंदे, अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, प्रांताधिकारी उज्वला गाडेकर, डीवायएसपी राजश्री तेरणी, तहसीलदार बाई माने, मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य, स्वच्छता आणि सुरक्षिततेवर भर
आमदार महेश शिंदे म्हणाले की, श्री सेवागिरी यात्रेत येणाऱ्या भाविकांसाठी शुद्ध पाणी, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेच्या उपाययोजना ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे.
यात्रेतील जिलबी, फरसाण व खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखण्यासाठी अन्न भेसळ विभागाने सतत तपासणी करावी. श्री सेवागिरी मंदिर परिसर व रथमार्गावरील सर्व अडचणी दूर करण्यास सांगताना त्यांनी वीज वितरण कंपनीला पुरेशा दाबाने अखंडित वीजपुरवठा करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी लागणारा निधी आमदार फंडातून उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
महिलांसाठी कॅन्सर व इतर आरोग्य तपासणी मोहीम राबवण्याचे आदेशही त्यांनी आरोग्य विभागाला दिले.
पोलिसांनी वाहतूक नियंत्रण व सुरक्षा यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सतत नजर ठेवावी, असेही ते म्हणाले.
जनावरांची तपासणी व रस्त्यांची डागडुजी आवश्यक
बैल बाजारात येणाऱ्या जनावरांचे लंपी आजार प्रतिबंधक लसीकरण झाले आहे की नाही, याची खात्री करण्याचे आदेश देण्यात आले.ग्रामीण मार्गांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी सूचना करण्यात आली.बैठकीत आरोग्य, वीज, पाणीपुरवठा, कृषी, पशुसंवर्धन, पोलीस, परिवहन, ग्रामपंचायत व महसूल विभागांच्या तयारीचा आढावा घेऊन पुढील नियोजन करण्यात आले.
भाविकांना सर्वोत्तम सेवा-सुविधा द्याव्यात : आमदार शशिकांत शिंदे
आमदार शशिकांत शिंदे यांनीही श्री सेवागिरी महाराज यात्रेचा नावलौकिक वाढत असून, भाविकांना सर्वोत्तम सेवा-सुविधा प्रशासनाकडून मिळाव्यात यावर भर दिला. अतिरिक्त जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी श्री सेवागिरी यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.
चेअरमन संतोष वाघ म्हणाले की, श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रा कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांच्या नियोजनासाठी गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा व आरोग्य विभागाकडून भाविकांना स्वच्छ पाणीपुरवठा व आरोग्यदायी सेवा उपलब्ध करून द्याव्यात. एस.टी महामंडळाकडून भाविकांना जास्तीत जास्त जवळ सेवा देण्याचे नियोजन करावे. यात्रा कालावधीत मोठ्या प्रमाणात भाविक व यात्रेकरू यात्रेचा आनंद घेण्यासाठी येत असतात महावितरण वीज कंपनीने यात्रा कालावधीत अखंडपणे पुरेसा विद्युत पुरवठा करावा, पोलीस विभागाने वाहतुक व पार्किंगचे नियोजन चांगले करावे जेणेकरून भाविक भक्तांना यात्रास्थळावर जाण्यास त्रास होणार नाही. त्या दृष्टीने नियोजन करावे. सूत्रसंचलन मोहन गुरव यांनी केले तर आभार विश्वस्त रणधीर जाधव यांनी मानले.
शशिकांत शिंदे यांनी विकास साद मांडली, महेश शिंदे यांनी प्रतिसाद दिला
श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेच्या काळात तसेच इतर वेळी तीर्थक्षेत्र पुसेगावमध्ये भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र छत्रपती शिवाजी चौकात प्रवासी व भाविकांसाठी शौचालय सुविधा नसल्यामुळे गैरसोय होत आहे. याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना शौचालय बांधण्याचा प्रस्ताव तातडीने मांडण्याचे निर्देश दिले. तसेच या शौचालयासाठी लागणारा निधी शशिकांत शिंदे व महेश शिंदे यांच्या फंडातून उपलब्ध करून दिला जाईल.
याबाबत आमदार महेश शिंदे म्हणाले, “कोरेगाव विश्रामगृहाच्या धर्तीवर पुसेगाव विश्रामगृहासाठी ६ कोटींचा निधी तातडीने मंजूर केला जाईल,” असे सांगून त्यांनी शशिकांत शिंदे यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला.
शेतकऱ्यांसाठी AI शेतीविषयक कृषी चर्चासत्र आयोजित करा : आमदार महेश शिंदे
स्थानिक बातम्या
न्यू इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
सातारा नगरपालिका निवडणुक : ५१ सराईत गुन्हेगार हद्दपार
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
दोन्ही राजेंविरोधात जनतेची नाराजी : शरद काटकर
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
प्रभागाचा विकास हाच माझा ध्यास : मिनाक्षी मोरे
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
संबंधित बातम्या
-
पंतप्रधान पदासाठी लवकरच मराठी माणूस दिसेल.
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेतील विद्यार्थी अध्ययनासाठी करणार टॅबचा वापर
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
-
सुरुचि महिला ग्रंथालय कराड येथे दिनांक 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
-
पुसेसावळीतील अतिक्रमणला जबाबदार बेरजेचे राजकारण कि राजकीय दबावातील प्रशासन?
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
-
मलवडी येथील खंडोबा देवाचा 1 डिसेंबरला रथोत्सव..
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
-
नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने 2 डिसेंबर रोजी सुट्टी
- Fri 5th Dec 2025 08:39 pm
-
निवडणुकीतील भरकटलेली जनता, निर्ढावलेले नेते अन् व्यवसायीक राजकारण.
- Fri 5th Dec 2025 08:39 pm












