अपघातात जखमी उदमांजरास वनविभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्सकडून रेस्क्यू व उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त

महाबळेश्वर : महाबळेश्वर–तापोळा रोडवर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ऊद मांजराला  वनविभाग व ‘सह्याद्री प्रोटेक्ट’च्या जवानांनी वेळीच रेस्क्यू करत जीवदान दिले. रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत वन्यप्राण्याची माहिती संताजी शिंदे यांनी  सह्याद्री प्रोटेक्टर्स च्या जवानांना कळविली घटना स्थळी जाऊन पाहता हा प्राणी उद मांजर असल्याचे लक्षात येताच जवानांनी ही बाब तातडीने वनविभागात कळवली वनविभागाचे कर्मचारी  देखील  घटनास्थळी दाखल झाले. जखमी उदमांजरास सुरक्षित पकडून येथील हिरडा वन विश्राम गृह येथे आणण्यात आले दुसऱ्या दिवशी त्यावर औषध उपचार करून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 


   वनक्षेत्रपाल महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शना खाली वनपाल सुनील लांडगे वनरक्षक लहू राऊत सह्याद्री प्रोटेक्टर्स चे हर्ष साळुंखे आणि साहिल सुतार यांनी मदत कार्या मध्ये सहभाग घेतला. 


      महाबळेश्र्वरचा परिसर जंगलांनी वेढला असून बऱ्याच प्रकारचे वन्यजीव या मध्ये वास्तव्यास असतात रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधत बऱ्याचदा प्राणी रस्ता  ओलांडताना दिसतात वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या प्राण्याच्या घटना या आधी ही घडल्या आहेत जंगल परिसरातून वाहने चालवत असताना वेगमर्यादा पाळाव्यात तसेच प्रवास करताना सतर्क राहावे असे आवाहन वनविभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्स यांच्यावतीने करण्यात येत आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला