शेतकऱ्यांचे नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही-धैर्यशील पाटील

खटाव : उबर्डे येथे उरमोडी पोट कॅनॉलच्या पाईपलाईनचे काम सुरु आहे.हे काम सुरु असताना ठेकेदारकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकाची नासाडी करण्यात आली आहे. तर अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन तोडण्यात आल्या असून त्या दुरुस्त केल्या गेल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान खपवून घेतले जाणार नाही.त्यामुळे नुकसान करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असा इशारा आज मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिला आहे. 
          उंबर्डे ता खटाव येथे आज मनसे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन बांधावर जाऊन शेतकरी बांधवांची भेट घेतली.यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार,  तालुकाध्यक्ष दिगंबर शिंगाडे, जिल्हा संघटक सुरज पवार, विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष अभिजीत साळुंखे, महेश बागल,निलेश सोनवणे,अथर्व खराडे,उमेश वीर ,चैतन्य ईगंळे,विक्रम गलंडे,विशाल पवार,प्रदिप जगताप, प्रतिक बोटे,हर्शल गोडसे, शेतकरी राजाराम पवार,गौरव पवार, दशरथ पवार, गणेश पवार, सोमनाथ पवार, रामभाऊ पवार,सचिन पवार, नितीन इंगळे आदी उपस्थित होते. 
     यावेळी बोलताना श्री पाटील म्हणाले की,गेल्या आठ  दिवसांपासून शेतकऱ्यांकडून तक्रारी येत होत्या. त्या तक्रारी अनुषंगाने आज मी व इतर पदाधिकारी यांनी याठिकाणी भेट दिली असता याठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करणायत आले आहे. याठिकाणी भर पिकातून चर  खानन्यात आली आहे. उरमोडीचे काम चालू आहे हे चांगलंच आहे. मात्र या शेतकऱ्यांचे नुकसान करून हे काम सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. 
      आज संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई  द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. संबंधित ठेकेदाराला शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही याबाबत सूचना द्यावी असे ही सांगण्यात आले आहे. याबाबत त्वरित तोडगा काढावा अन्यथा येत्या आठ दिवसात मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करणायत येईल असा इशारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिला आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त