माझे कोणाशीही आणि कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत....आमदार मकरंद पाटील

सातारा : सालोशीतील वळवीवस्तीवर विद्युतीकरण काम जिल्हा नियोजन आराखड्यांतर्गत उपसरंपच विठ्ठल मोरे आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मंजूर केले होते. याप्रकरणी कोणीही देाषी असल्यास कारवाई करावी. माझे कोणाशीही आणि कसलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत. मी फक्त जनतेच्या हिताचा विचार करुन कामे करीत असल्यामुळे कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्याची तयारी आहे, असे स्पष्टीकरण आमदार मकरंद पाटील यांनी दिले.

युवक काॅंग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आमदार मकरंद पाटील यांच्यावर झाडाणी येथील प्रकरणात आरोप केल्यानंतर आमदार पाटील यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महाबळेश्वर तालुक्यातील सालोशीतील वळवीवस्तीवर विद्युतीकरण काम मंजूर केले. कारण, ट्रान्सफाॅर्मर बसविल्यास आजुबाजुच्या गावातील लोकांचा विजेचा आणि पाण्याचा प्रशन सुटण्यास मदत होणार आहे. संबंधित पत्र हे विद्युतीकरणासाठी दिलेले होते. यामध्ये मी याकामासाठी किती रक्कम लागणार हे नमुद केले नव्हते. त्याबाबतचे अंदापत्रक हे संबंधीत अधिकाऱ्यांनी करावयाचे असते. यामधून कोणा एका व्यक्तीचा फायदा व्हावा असा कोणताही हेतू नव्हता. चंद्रकांत वळवी या इसमाशीही माझा कोणताही संबंध नाही. लोकप्रतिनिधींनी शिफारस पत्र दिल्यानंतर संबंधीत गावाची पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करणे प्रशासन आणि अधिकाऱ्यांचे काम असते.

माझ्या विरोधात पत्रकार परिषद घेऊन कोणीतरी बेछुट आरोप केले आहेत. वास्तविक विविध कामासांठी त्या-त्या भागातील कार्यकर्ते विविध प्रश्न आणि कामासाठी शिफारस पत्र मागतात. लोकांच्या अडचणी सोडविण्याच्या उद्देशाने अशी पत्रे दिली जातात. लोकांचे प्रश्न तत्काळ सुटावेत असा हेतू त्यापाठीमागे असतो. माझ्या मतदारसंघात अनेक छोट्या लोकवस्तीची गावे आहेत. तेथील कार्यकर्ते नेहमीच विकासकामासाठी पाठपुरावा करत असतात. कार्यकर्त्याच्या मागणीनुसार अशी पत्रे देत असतो. त्यातून झालेल्या विकासकामाचा फायदा किंवा गैरफायदा कोणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घेत असेलतर त्याची माहिती प्रशासनाने घेतली पाहीजे. जे चुकीचे असेल ते नाकारण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यामुळे चुकीचे काही घडले असल्यास प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. कोणत्याही बेकायदेशीर कामाशी संबंध नाही, असेही आमदार पाटील यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

सालोशी उपसरपंचांचे स्पष्टीकरण...

याबाबत सालोशीचे उपसरंपच विठ्ठल मोरे यांनीही स्पष्टीकरण दिले आहे. सालोशी येथे वळवीवस्ती असून या ठिकाणी सहा घरे आहेत. विद्युत ट्रान्सफाॅर्मरमुळे परिसरातील दोन-तीन गावातील लोकांना विहीरीवरुन पाणी आण्यासाठी मोठी पायपीठ करावी लागते. ती गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. मी आणि ग्रामस्थ आमदार मकरंद पाटील यांच्याकडे कामाची मागणी करण्यासाठी गेलो होतो. त्यानुसार आमदार पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पत्राद्वारे शिफारस केली होती, अशी माहिती उपसरपंच मोरे यांनी दिली.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त