महामार्गावरील खांबाटकी बोगद्याजवळ कंटेनर, टँकर व तीन कारचा विचित्र अपघात
Satara News Team
- Sat 25th Jan 2025 08:59 am
- बातमी शेयर करा
सातारा : पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खांबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर, टँकर व तीन कार यांचा विचित्र अपघात झाला. यामध्ये तीन कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.तर खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील दोन टायर धडीसह निसटल्याने कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जुन्या टोलनाक्याजवळ एका कंटेनरची पुढील दोन्ही चाके निखळल्याने रस्त्यावरच आडवा झाला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या बोगद्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. हा कंटेनर रस्त्यातून बाजूला काढण्याचे काम सुरू होते. याचवेळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास खांबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर उतारावर कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कंटेनरने एका कारला धडक दिली. ही कार पुढील टँकरवर आदळली त्याचवेळी कंटेनर ने दुसर्या दोन कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एक कार दुसर्या कारवर आदळून ती त्या कारच्या वर जाऊन आदळली. या अपघातामुळे खांबाटकी बोगदा ते जुन्या टोलनाक्या पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने वाहने बाजूला हटवून वाहतूक सुरळीत केली.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 25th Jan 2025 08:59 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 25th Jan 2025 08:59 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 25th Jan 2025 08:59 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 25th Jan 2025 08:59 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 25th Jan 2025 08:59 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 25th Jan 2025 08:59 am
संबंधित बातम्या
-
फलटण येथे चायनीज मांजाने कापला गळा
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
साताऱ्यात उलटा धबधबा पाहायला गेलेली कार ३०० फूट दरीत
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
वीजेचा शॉक लागून २ वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
मुलीचा प्रेमविवाह; धक्क्यातून आईने जीवन संपवले
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली!
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
पुसेसावळी येथील युवकाने गळफास घेऊन संपवली जिवनयात्रा?.
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना; पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण...,
- Sat 25th Jan 2025 08:59 am
-
पुसेसावळी येथे झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
- Sat 25th Jan 2025 08:59 am













