मेढा चौकातील पुनर्स्थापित स्मारकाचे काम पूर्णत्वास गेल्यावरच उद्घाटन
देशातील हुतात्म्यांच्या आदर्शाची जपणूक करुयात.. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसलेमोहन जगताप
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
- बातमी शेयर करा
जावली तालुक्यातील सैनिकी परंपरेला साजेसे असलेल्या स्मारकासाठी तहसील विभागाच्यावतीने वतीने विशेषता तहसीलदार राजेंद्र पोळ, नायब तहसीलदार संजयजी बैलकर यांच्या मध्यस्थीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रा उभे राहणारे पुनर्स्थापित स्मारक जावली तालुक्याचे अभियानात व सौंदर्यात भर घालणारे ठरेल बाजीराव चिकणे जेष्ठ समाजसेवक जावली
मेढा : जावली तालुक्याच्या मातीत ऐतिहासिक परंपरेला छत्रपतींच्या पावन भूमित देशासाठी लढवय्यांनी दिलेली प्रेरणा व त्यांनी केलेल्या कामगिरीची आम्ही दखल घेत असून आदर्श जावळीच्या लोकांनी सैनिकी परंपरेतील काम नव्या पिढीला दिशा व आदर्श देण्याचे काम या सैनिकांमुळे घडत असल्याचे प्रतिपादन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. प्रती वर्षाप्रमाणे ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून मेढा येथील जागतिक महायुद्धात 1914 ते 1919 या कालावधीत मराठा लाईट इनफट्री यूनिट मधील कूसावडे बामणोली येथील जवान कोंडीबा गोपाळ
मरागजे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आज अपूर्ण अवस्थेतील स्मारकाचा उद्घाटना कार्यक्रम पुढे ढकलून तो स्मारकाची प्रतीकात्मक कामे पूर्ण झाले नंतर घेवू असे सांगून फक्त अभिवादन कार्यक्रमात करण्यात आला..यावेळी सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार राजेंद्र पोळ, गटविकास अधिकारी काळे,सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने,मेढा नगर पंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार निवासी नायब तहसीलदार संजय बैलकर आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते...
विटा सातारा मेढा मार्गे महाबळेश्वर रस्ता रुंदीकरण कामास अडथळा निर्माण होत असलेल्या मेढा चौकातील शताब्दीवर्षा पूर्वीच्या स्मारकाच्या पुनर्स्थापित जागेत या सोहोळ्याच्या कार्यक्रमास आलेल्या हुतात्मा जवानांचे वंशज आनंद मरागजे यांनी प्रास्ताविकात म्हणाले की पूर्वी प्रमाणे असलेल्या स्मारकाची प्रतिकृती बनवून जावली तालुक्याची अस्मिता जगविण्यासाठी महसूल विभागाने प्रामाणिकपणे आपली भूमिका स्पष्ट केली.बांधकाम विभाग व रस्ता रोडवेज सोल्युशन कंपनीने बांधलेल्या स्मारकास नाराजी व्यक्त करून पूर्वी प्रमाणे असलेल्या बांधकामाच्या धर्तीवर हे स्मारक उभारण्याची मागणी केली.त्यास तातडीने आ. भोसले यांनी उद्घाटन समारोह स्थगित करून फक्त अभिवादन कार्यक्रमास करण्याची वेळ आज बांधकाम विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे आली.
या कार्यक्रमास जवळवाडी सरपंच
सुरेखा मर्ढेकर,मंडलअधिकारी संतोष मुळीक, आनंद सकपाळ, राजेंद्र सावंत,सूरज सावंत परिसरातील ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत सतीश मर्ढेकर यांनी केले
सर्वसमावेशक अशा स्मारकाची पुनर्स्थापित मूळ रचना होती त्याच धर्तीवर उभारणी करण्याच्या सूचना अधिकारी व रोडवेज सोल्युशन कंपनीस आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्या असून या सूचनांचे पालन त्वरित करून संबधित यंत्रणेस काम तातडीने करण्याच्या दृष्टीने महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना उपविभागीय अधिकारी तथा प्रांत मिनाज मुल्ला यांनी दिल्या.असून हयगय करणार्या संबधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यास पाठीशी घालणार नसल्याचे तहसील
राजेंद्र पोळ यांनी यावेळी प्रतिनिधीस
सांगितले...
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Tue 9th Aug 2022 12:23 pm
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Tue 9th Aug 2022 12:23 pm













