मंत्रिमंडळ विस्तारात वाईला खासदारकी का मंत्रीपद?. भाजपकडून गादीचा मान का माण चा सन्मान ?
Satara News Team
- Wed 19th Jun 2024 08:57 am
- बातमी शेयर करा
सातारा : राज्यमंत्रीमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू असून, पाठीमागे स्वत:हून दूर राहिलेल्या आमदार मकरंद पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते, तर भाजपमधूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. सध्या जिल्ह्यात एक मंत्रिपद असले, तरी आणखी दोन मंत्र्यांची भर पडू शकते, असे सध्याचे तरी चित्र आहे.
अजितदादांनी त्यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना राज्यसभेवर खासदार करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे मकरंद पाटील यांना मंत्रिपद दिले, तर नितीन पाटील यांना सध्यातरी खासदारकीपासून दूर राहावे लागण्याची शक्यता. दोन्हीपैकी एक जरी संधी वाई तालुक्यासाठी आली तरी अजितदादांनी आपला शब्द पाळला असेच म्हणावे लागेल.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यातच ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची नाराजी दूर करणे आणि महायुतीची ताकद वाढविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच पुढील आठवड्यात राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वीच मंत्रीमंडळ विस्तार होऊ शकतो. यासाठी महायुतीतील तिन्ही वरिष्ठ नेत्यांत याबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात विस्तार होऊ शकतो. भाजप, शिंदेसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही अनेकजण इच्छुक आहेत. अनेकांनी फिल्डींग लावण्यास सुरुवात केली आहे.
सातारा जिल्ह्यालाही या मंत्रीमंडळ विस्तारात स्थान मिळू शकते. राष्ट्रवादीकडून वाईचे आमदार मकरंद पाटील हे दावेदार आहेत. एक वर्षापूर्वी अजित पवार महायुतीबरोबर गेल्यावर ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिपदासाठीचे १० वे नाव हे मकरंद पाटील यांचे होते. पण, त्यावेळी ते स्वत:हून बाजूला राहिले. या विस्तारातही ते दावेदार आहेत. अजित पवार कोणाला ताकद देणार हे लवकरच स्पष्ट होईल, तर भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे दावेदार आहेत. आमदार गोरे यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. भाजपमधून दोघांची नावे आघाडीवर असली, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाला झुकते माप देणार याकडे लक्ष असणार आहे. त्यातच जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी साताऱ्याला आणखी एक मंत्रिपद देऊन पक्षाची ताकद आणखी वाढविण्याचा भाजपचा विचार असणार आहे, तर शिंदेसेनेकडून शंभूराज देसाई मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून कोणाला मंत्रिपद मिळणार नाही हे स्पष्ट आहे.
साताऱ्यात दोन मंत्रिपद तीन महिन्यासाठी देऊन सातारकरांची समजूत काढण्यात महायुती कितपत यशस्वी होते हेच पहावे लागणार आहे.
स्थानिक बातम्या
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Wed 19th Jun 2024 08:57 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 19th Jun 2024 08:57 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 19th Jun 2024 08:57 am
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 19th Jun 2024 08:57 am
वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ
- Wed 19th Jun 2024 08:57 am
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Wed 19th Jun 2024 08:57 am
संबंधित बातम्या
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Wed 19th Jun 2024 08:57 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Wed 19th Jun 2024 08:57 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Wed 19th Jun 2024 08:57 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Wed 19th Jun 2024 08:57 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Wed 19th Jun 2024 08:57 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Wed 19th Jun 2024 08:57 am
-
हुजरेगिरीची कला : काल शशिकांत शिंदे, आज बाबाराजे!
- Wed 19th Jun 2024 08:57 am












