बुलेट पल्सर मोटरसायकल चोरी प्रकरणी दोन चोरटे अटक
सातारा शहर पोलिसांची कारवाईSatara News Team प्रकाश शिंदे
- Fri 1st Jul 2022 11:05 am
- बातमी शेयर करा
भादविसक ३७९ सदर दोन्ही मोटारसायकल या वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हददीतील असल्याने संबंधित पोलीस ठाणेस सदरची माहिती देण्यात आलेली आहे.
सातारा शहरामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हयाचे अनुशंघाने सातारा शहर डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ पेट्रोलिंग करीत असताना मा. वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. भगवान निंबाळकर यांना बातमीदारामार्फत मोटारसायकल चोरीतील संशयित युवकांची माहिती प्राप्त झाली त्याअनुशंघाने सातारा शहर डी. बी. पथकास मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांना पकडणेबाबत मार्गदर्शन व सुचना दिल्या. त्याअनुशंघाने डी.बी. पथकातील पोलीस स्टाफ सातारा शहरामध्ये पेट्रालिंग करित असताना अजंठा चौक परिसरामध्ये दोन युवक विना नंबर प्लेट बजाज पल्सर मोटारसायकलवरून संशयास्पद फिरताना दिसून आले. त्यास डी.बी. पथकाने सदरची मोटारसायकल पाठीमागून पकडली असता त्यांनी सदरची मोटारसायकल जबरदस्तीने चालवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी डी.बी. पथकातील स्टाफने त्यांना जागीच पकडले. त्यांचेकडे सदर मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता त्यांना कोणतेही समाधानकारण उत्तरे देता आली नाहीत. म्हणून सदर युवकांना ताब्यात घेवून त्यांना अटक करून त्यांचेकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्यांनी सदरची मोटारसायकल हि चोरीची असून ती त्यांना त्यांचे अन्य एका साथीदाराने दिल्याचे सांगितले. सदर मोटारसायकल हि बारामती तालुक्यातून चोरी झालेली समजून आले. तसेच त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांचेकडून आणखी एक बुलेट मोटारसायकल चोरी केली असल्याचे समजले. सदरची बुलेट मोटारसायकल देखील जप्त करण्यात आलेली आहे.
भादविसक ३७९ सदर दोन्ही मोटारसायकल या वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हददीतील असल्याने संबंधित पोलीस ठाणेस सदरची माहिती देण्यात आलेली आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक साो अजयकुमार बन्सल, मा अपर पोलीस अधिक्षक सो. अजय बो-हाडे, मा सहा. पोलीस अधिक्षक सो आँचल दलाल मॅडम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगवान निंबाळकर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्री. सुधीर मोरे, पो.ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, गणेश घाडगे, संतोष कचरे यांनी केलेली आहे.
sataracrime
satarapolice
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 1st Jul 2022 11:05 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 1st Jul 2022 11:05 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 1st Jul 2022 11:05 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 1st Jul 2022 11:05 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 1st Jul 2022 11:05 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 1st Jul 2022 11:05 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 1st Jul 2022 11:05 am













