श्रीपालवण मध्ये दिवाळी महोत्सव जल्लोषात....

श्रीपालवण येथे दिवाळी महोत्सव समिती व भैरवनाथ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी महोत्सव 2022 चे आयोजन केले होते.

दै, सातारा न्यूज
 मलवडी, ता : २८
    श्रीपालवण येथे दिवाळी महोत्सव समिती व भैरवनाथ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी महोत्सव 2022 चे आयोजन केले होते. 
   यंदाचे दिवाळी मोहत्सवाचे हे १३ वे वर्ष असून यामध्ये एसटी पूजन रक्तदान शिबिर, किल्ले स्पर्धा व महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. दि. 24 रोजी लक्ष्मीपूजन दिवशी सकाळी साडेसहा वाजता ग्रामीण व डोंगराळ भागातील प्रवासाचे एकमेव साधन असलेले लाल परी म्हणजेच एसटी चे पूजन करण्यात आले त्याचबरोबर एसटीचे चालक वाहक यांच्या प्रतिकृतज्ञता म्हणून त्यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांनी केला.
    सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास 30 लोकांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास दिवाळी महोत्सव समितीमार्फत भेटवस्तू देण्यात आली.
दुपारी तीन वाजता किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते त्यात प्रेम शांताराम ढेंबरे यांनी बनवलेल्या किल्ल्याला प्रथम क्रमांक मिळाला.
संध्याकाळी आठ वाजता महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये प्रथम क्रमांक मिळवून प्रतीक्षा अमर कदम या होम मिनिस्टर ठरल्या त्यांना मानाची पैठणी मिळाली.
द्वितीय क्रमांक रूपाली किसन निर्मळ ,  तृतीय क्रमांक लता नामदेव ढेंबरे यांनी पटकावला. 
   या स्पर्धा पार पाडण्यासाठी किरण ढेंबरे , विशाल कदम व अध्यक्ष वैभव चव्हाण, तसेच वैभव ढेंबरे (पोलीस पाटील) यांनी विशेष  परिश्रम घेतले

 

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला