एकीव धबधब्याजवळ दरीमध्ये दोन इसमांना ढकलून देवून केलेला दुहेरी खूनाचा गंभीर गुन्हा ७२ तासात उघड.
Satara News Team
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यामधील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या कास परिसरातील एकिव धबधब्याच्या कड्यावरून दोन तरुणांना 700 ते 800 फूट खोल दरीत ढकलणाऱ्या 5 संशयितांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेत दोघा युवकांचाही मृत्यू झाला असल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सातारा तालुक्यातील बसप्पाचीवाडी व करंजे पेठ येथील अक्षय आंबवले व गणेश फडतरे अशी खून झालेल्या युवकाची नावे आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी, रविवारी जावळी तालुक्यातील एकीव धबधब्यावर फिरण्यासाठी चार युवक गेले होते. यावेळी काही जणांच्यात भांडणे झाल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले होते. भांडण सुरू असतानाच मुख्य धबधब्याच्या खालच्या बाजूला गेले असता दोघेजण 700 ते 800 फूट खोल दरीत कोसळले असल्याचेही बोलले जात होते. मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्यासह त्यांची टीम संशयितांच्या शोधात होती.
साताऱ्यातील दोन्ही युवकांना धबधब्यावरून खाली ढकलणाऱ्या संशयित आरोपी :- १) आसिफ मज्जिद शेख वय २२ वर्षे २) निखील राजेंद्र कोळेकर वय २३ वर्षे ३) साहिल मेहबूब शेख वय १८ वर्षे सर्व रा. भिमाबाई आंबेडकरनगर सदरबझार सातारा यांना मेढा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. तर अजूनही या गुन्ह्यातील 5 संशयित फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, त्याचा शोध पोलिस घेत आहेत. संशयितांना परजिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले .ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता त्यांनी मयत दोन इसम व त्यांच्यामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरुन दोन्ही इसमांना मारहाण करुन दरीमध्ये ढकलून दिले असल्याचे सांगितल्याने सदरचा दुहेरी खुनाचा गुन्हा ७२ तासाचे आत उघडकीस आला असून नमुद तीनही इसमांना पुढील कार्यवाहीकामी मेढा पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बाळासाहेब भालचिम उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग वाई, अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, संतोष तासगांवकर मेढा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि, रविंद्र भोरे, विश्वास शिंगाडे, पोउनि अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, लैलेश फडतरे, सचिन साळुंखे, प्रविण फडतरे, सनी आवटे, राकेश खांडके, हसन तडवी, अमित झेंडे, अजय जाधव, अमित माने, अविनाश चव्हाण, मनोज जाधव, राजू कांबळे, गणेश कापरे, स्वप्नील कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, प्रविण कांबळे, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, पृथ्वीराज जाधव, शिवाजी गुरव, अमृत करपे मेढा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विकास गंगावणे, दत्तात्रय शिंदे, संभाजी बाबर, अभिजीत वाघमाळे, प्रदिप उदागे, निलेश देशमुख, गणेश घोरपडे, वाई पोलीस ठाणेकडील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती स्नेहल सोमदे, श्रावण राठोड, प्रेमजित शिर्के, प्रशांत ठोंबरे यांनी सहभाग घेतला असुन कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा, श्री बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Fri 21st Jul 2023 05:59 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Fri 21st Jul 2023 05:59 pm













