खरेदी दस्ताची नोंद मंजूर करण्यासाठी तीन हजारांची लाच; मंडलाधिकारी रंगेहाथ जाळ्यात

पुसेगाव ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर एसीबीची कारवाई; किशोर खटावकर ताब्यात

पुसेगाव :  जमिनीच्या खरेदी दस्ताची नोंद प्रमाणित करून मंजूर करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना पुसेगाव (ता. खटाव) येथील मंडलाधिकारी किशोर नंदू खटावकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.

       तक्रारदाराने धावडदरे (कटगुण), ता. खटाव येथील गट क्रमांक १९१ मधील ०.४२ आर क्षेत्राची जमीन ११ ऑगस्ट २०२६ रोजी खरेदी केली होती. या खरेदी दस्ताची नोंद करण्यासाठी १९ ऑगस्ट रोजी तलाठी कार्यालयात अर्ज करण्यात आला. त्यानंतर तलाठी, कटगुण यांनी २ सप्टेंबर रोजी नोंद घेऊन ती प्रमाणित करण्यासाठी मंडलाधिकारी किशोर खटावकर यांच्याकडे ऑनलाइन पाठविली.

      नोंद मंजूर करण्यासाठी खटावकर यांनी तक्रारदाराकडे तीन हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार सोमवारी एसीबीकडे करण्यात आली. तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने सापळा रचला. पुसेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर खटावकर यांनी पंचांसमक्ष तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. 

       याप्रकरणी पुसेगाव पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक सुनील दाजी पाटील, पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा पथकात पो. हवा. नितीन गोगावले, पो. हवा. निलेश राजपूरे, पो. हवा. निलेश चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल सत्यम थोरात आणि चा. पो. हवा. अजित कर्णे यांचा समावेश होता. कारवाईसाठी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे व अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला