हॉटेल बेसिलिकाच्या अतिक्रमणावर पाचगणी पालिकेचा हातोडा
Satara News Team
- Sat 1st Jun 2024 11:45 am
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा जिल्ह्यातील पाचगणी शहराचे मुख्य प्रवेशव्दार राज्य महामार्ग क्र १३९ लगत दांडेघर नाक्याचे रस्ता रुंदीकरणाचे कामामध्ये अडथळा ठरणारी हॉटेल बेसिलिका लगत अतिक्रमण केलेले कंपौन्ड वॉल पालिकेने जेसीबीच्या साहाय्याने शुक्रवारी पाडली.
कारवाई नगरपालिकेचे अतिक्रमण पथकाने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशान्वये वाई उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, महाबळेश्वर तहसिलदार तेजस्विनी पाटील, मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील जाधव, सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार आणि पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीमध्ये दुपारी करण्यात आली.
जेव्हा ही अतिक्रमण हटावची कारवाई करण्यात आली तेव्हा मिळकतधारक आणि पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सामोपचाराने मिळकतधारक यांनी उर्वरित अतिक्रमण हे ३ दिवसांचे आत स्व:खर्चाने काढून घेत असलेचे आश्वासित केले आहे. त्यानंतर अतिक्रमण मोहीम थांबविण्यात आली.
अतिक्रमण केलेली कंपौन्डवॉल काढल्यानंतर रस्तारुंदीकरणाच्या कामांमुळे पाचगणी महाबळेश्वर येथे येणा-या पर्यटकांना तसेच स्थानिक नागरीकांना वाहतुकीचा भेडसावणारा प्रश्न निकालात निघणार असून वाहतूक नियंत्रण यंत्रणा सुरळीत होणेस मदत होणार आहे. असे यावेळी मुख्याधिकारी तथा प्रशासक निखील जाधव यांच्या वतीने सांगण्यात आले.
स्थानिक बातम्या
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 1st Jun 2024 11:45 am
गव्हाच्या पिकात नशिल्या शेतीचा पर्दाफाश पाली गावात तब्बल 51 किलो असा गांजा जप्त
- Sat 1st Jun 2024 11:45 am
आ.सदाभाऊ खोत यांच्या उपस्थितीत शिवथरमध्ये विकासकामांचे भूमिपूजन
- Sat 1st Jun 2024 11:45 am
भ्रष्टाचाराचे आरोपी असलेल्या अधिकाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीवर महाराष्ट्र संघर्ष समितीचा घणाघात
- Sat 1st Jun 2024 11:45 am
म्हसवड नगरपरिषदेत सूर्यवंशी दाम्पत्य ठरले ’धुरंदर’!
- Sat 1st Jun 2024 11:45 am
सातारा नगरपरिषद निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान
- Sat 1st Jun 2024 11:45 am
संबंधित बातम्या
-
जिल्हा परिषदेच्या इमारतीत चक्क दुरुस्तीची कामे
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
पुसेसावळी येथे लागोपाठ चोऱ्यांचे सत्र सुरूच, पोलिस प्रशासन मात्र हतबल!
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
सहा.पो.नि. अक्षय सोनवणे यांचा सराईत गुन्हेगारांना दणका
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
पुसेसावळीतील सावकारी च्या 'उदय' मुळे कळंबीतील एक कुटुंब 'अस्त' होण्याच्या मार्गावर...
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
वडूज येथील रास्तभाव दुकानाबाबत दोष आढळल्याने नोटीस.
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
औंध पोलिस ठाण्याचे कारभारी मतेंवर गोरे अंकुश ठेवणार? कि पोलिस अधीक्षक दोषी ठरवणार?
- Sat 1st Jun 2024 11:45 am
-
जिल्हा परिषद नगररचना विभागात रंगली सामूहिक बिर्याणीची पार्टी.
- Sat 1st Jun 2024 11:45 am












