जंतर-मंतरवरील रासपच्या मोर्चाला माण'मधून हजारो कार्यकर्ते जाणार :- दादासाहेब दोरगे
एकनाथ वाघमोडे - Thu 28th Jul 2022 05:26 am
- बातमी शेयर करा
दहिवडी : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जाणकर यांच्या नेतृत्त्वाखाली दि. ५ ऑगष्ट रोजी रासप पक्षाच्या वतीने दिल्लीत जंतर -मंतरवर विविध मागण्यांसाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून सातारा जिल्ह्यातील रासपच्या कार्यकर्त्यांनी या मोर्चात मोठ्या संख्येने उपस्थित राहवे. असे आवाहन सातारा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे यांनी म्हसवड येथे झालेल्या नियोजन बैठकीत केले आहे. यावेळी रासपचे प्रदेश उपाध्यक्ष बबनदादा विरकर , माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, जिल्हा युवक सचिव आकाश विरकर , माण तालुका अध्यक्ष दत्ता खांडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याबाबत रासपच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते तथा संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर साहेब यांच्या नेतृत्त्वाखाली दि. ५ ऑगष्ट रोजी जातीनिहाय जनगणना करणे, ओबीसी आरक्षण कायम करण्यात यावे, नॉन क्रिमिलिअरची , अट रद्द करणे, ५० टक्के सिलिंग हटवणे, सार्वजनिक संस्थानमध्ये संपुर्ण आरक्षण लागू करणे, न्याय व्यवस्था, केंद्रीय सार्वजनिक शैक्षणिक संस्थानमध्ये आरक्षण लागू करणे, शेतक-यांच्या मालाला हमीभावाने खरेदीची हमी द्यावी. देशात भरमसाठ वाढलेली महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी. तसेच नागरीकांना शिक्षण व आरोग्य या सुविधा मोफत उपलब्ध करुन देणे. इत्यादी प्रमुख मागण्यांसाठी रासपकडून दिल्लीत जंतर मंतरवर लाखोच्या मोचार्चे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील रासप कार्यकर्त्यांनी या मोर्चात हजारोच्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन रासपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब दोरगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
स्थानिक बातम्या
पत्रकारांना दलाल म्हणणाऱ्या मुजोर वाहतूक निरीक्षक शाहरुख खानचे निलंबन
- Thu 28th Jul 2022 05:26 am
सातारा तालुक्यात चोरीच्या दुचाकींचा पर्दाफाश; 4 वाहने जप्त : सातारा तालुका पोलिसांची कारवाई
- Thu 28th Jul 2022 05:26 am
मसूर पूर्व भागातील शेतकरी संतप्त; पाण्यासाठी शीत युद्ध सुरू
- Thu 28th Jul 2022 05:26 am
सत्यजित केसरी पर्व ४ थे’ ला बैलगाडा शौकीनांचा प्रचंड प्रतिसाद
- Thu 28th Jul 2022 05:26 am
वडगाव निं. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणातील डॉ. योगेश नरुटे अखेर पोलिसांच्या ताब्यात
- Thu 28th Jul 2022 05:26 am
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळेंनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांवर छापे ; १२ जणांवर गुन्हे
- Thu 28th Jul 2022 05:26 am
संबंधित बातम्या
-
फलटण शहर व तालुक्यातील निवासी अतिक्रमणे नियमित करणार.मा . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
राजीनाम्याचा लेटर बॉम्ब; साताऱ्यात शिंदे शिवसेनेत खळबळ
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मा.खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी घेतली भेट..
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
फलटण शहर जिल्हा मुख्यालय समान विकसित करण्याचा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा संकल्प.
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
संघ समजून घ्यायचा असेल तर ‘शतक’ नक्की पाहा- नितीन गडकरी
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
उंचिठाणे येथील उपसरपंच प्रताप शिंदेंवर राजकीय द्वेषातून आणि बालिश बुद्धीच्या जोरावरच बोगस आरोप.
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
फलटण तालुक्यात भाजपला आत्मचिंतन करायला लावणारा निकाल
- Thu 28th Jul 2022 05:26 am
-
सातारा जिल्हा (पंचायत समिती) एकूण 130 गण फायनल आकडेवारी
- Thu 28th Jul 2022 05:26 am













