मुख्यमंत्र्यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात..

पाचगणी :  महाबळेश्वर तालुक्यात शासनाच्या जी. आर. ला उप कोषागार अधिकारी यांच्याकडून केराची टोपली. दाखवली गेली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे 
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा  पगार अद्यापही झाला नाही .दिवाळी पूर्वीच शासकीय कर्मचाऱ्यांचा पगार त्यांच्या खात्यावर जमा करा असा आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला होता, या आदेशाची पूर्तता संपूर्ण महाराष्ट्रभर होत असतानाच मुख्यमंत्री शिंदे यांच्याच महाबळेश्वर तालुक्यात या आदेशाची पायमल्ली झाले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे .शासकीय कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आमचा पगार अजूनही झाला नाही. मुजोर कोषागार अधिकारी  याबाबत कोणतीही हालचाल करायला तयार नसल्याचे ही शासकीय कर्मचाऱ्यांनी सांगितले
दीपावली निमित्त महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार दिवाळी पूर्वी करण्यासाठी, दि.18/10/2022 रोजी जी. आर. काढला. त्या जी आर च्या आधारे महाबळेश्वर तालुक्यातील विविध विभागांनी 19/10/2022, 20/10/2022 यादरम्यान कर्मचाऱ्यांची पगार बिले उप कोषागार कार्यालय महाबळेश्वर येथे सादर केली. परंतु उप कोषागार अधिकारी,(sub treasury officer) यांनी पगार बिलास केराची टोपली दाखवून शासकिय कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात राहण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. बिले तपासणी साठी पुरेसा वेळ मिळून देखील सदर उप कोषागार अधिकारी मुद्दाम पगार बिले वेळेवर तपासणी करत नाहीत. अशाही तक्रारी शासकीय कर्मचाऱ्यांनी पत्रकारांना नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले
सदर अधिकाऱ्याविरोधात, शासकिय कर्मचाऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या असून अशा अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला आहे. हे अधिकारी नेहमी काहीतरी चिरीमिरी साठी बिलांची अडवणूक करत असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यातच शासनाच्या आदेशाची पायमल्ली करण्याऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून कारवाई हे शासन करणार का? की अशा अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार? हे पाहावे लागेल.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त