600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर
Satara News Team
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
- बातमी शेयर करा
सातारा :आजपासून राज्यातील राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार संपावर आहेत. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते, हा ग्रेड पे मुद्दा घेऊन नायब तहसीलदारांनी आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे आजपासून राज्यातील तहसील कार्यालयात शुकशुकाट असण्याची शक्यता आहे. 13 ऑक्टोबर 1998 रोजी राज्य सरकारने नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वाढवून वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात, परंतु त्यांना वेतन मात्र वर्ग तीनचे मिळत आहे. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर हा संप पुकारण्यात आला आहे. त्यानुसार 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार आजपासून संपावर आहेत. तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्या संपामुळे जनतेची अनेक कामे खोळंबणार आहेत. या संपामुळे शासकीय यंत्रणा कोलमडणार असून राज्यातील शेतकरी, कामगार आणि विद्यार्थ्यांना या संपाचा फटका बसू शकतो. या तिन्ही वर्गातील नागरिकांची अनेक कामे तहसीलदार कार्यालयाच्या अंतगर्त येतात. त्यामुळे या संपामुळे शेतकरी, सर्वसामान्य जनता आणि विद्यार्थी भरडला जात आहे हे मात्र नक्की….
स्थानिक बातम्या
जगन्मित्र कार्यकर्ते नाना शालगर यांचे निधन
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
संबंधित बातम्या
-
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
-
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
-
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
-
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
-
दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
-
औंध पोलीस स्टेशनकडून त्वरीत कारवाई: ट्रक चालकाची जबरदस्तीने लूट करणाऱ्या प्रकरणात गुन्हा दाखल
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm
-
कसं काय पाटील.. आनेवाडीत त्यादिवशी घडलेले खरं आहे का?
- Mon 3rd Apr 2023 04:11 pm










