ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे तसेच ग्रामस्थांचं उल्लेखनीय काम-सतीश बुद्धे

शिवथर- ग्रामपंचायतच्या माध्यमातून 15 वित्त आयोग 2022- 23 या वर्षातील बंदिस्त गटार पेवर ब्लॉक तसेच दलित वस्ती काँक्रिटीकरण व आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून सभामंडपाची कामे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहेत याबाबत ग्रामपंचायतचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांचं सहकार्य असल्यामुळेच अशी कामे होत असतात. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील हे कायमस्वरूपीच विकास कामाबाबत चर्चेत असतात असे प्रतिपादन सातारा गटविकास अधिकारी सतीश बुद्धी यांनी केले.
शिवथर तालुका सातारा येथे पेव्हर ब्लॉक तसेच बंदिस्त गटर कामाची पाहणी करताना ते बोलत होते
त्यावेळी ग्रामविकास अधिकारी विलासराव माने तसेच गणेश साबळे उपस्थित होते.
शिवथर येथे अचानकच गटविकास अधिकारी यांनी शिवथर ग्रामपंचायतला भेट दिली. आणि चालू असलेल्या कामाची पाहणी करत असताना ज्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकण्याचं काम चालू आहे त्या ठिकाणी पाणी करत असताना संबंधित नागरिक गणेश साबळे हे स्वतः पाणी मारत असतानाचे दिसून आल्याने गट विकास अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त करत असताना गणेश साबळे व ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
गावकऱ्यांच्या सहकार्यानेच ग्रामपंचायतचा विकास होतो असे ते बोलले.
चौकट -पंचवीस वर्षाच्या कालखंडामध्ये आजपर्यंत सातारा तालुक्यामध्ये पंधरा वित्त आयोगातून होणारे कामाची पाहणी करण्याकरता गटविकास अधिकारी आलेलेच नव्हते परंतु सातारा गटविकास अधिकारी सतीश बुद्धी हे स्वतः कामाची पाहणी करण्याकरता आले याबाबत ग्रामस्थांनी त्यांचे कौतुक केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त