सौ सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये 'शारदोत्सव' उत्साहात
कोमल वाघ /पवार
- Sat 1st Oct 2022 10:46 am
- बातमी शेयर करा
सातारा : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित सुशीलादेवी साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी 'शारदोत्सव' उत्साहात पार पडला. विद्यालयात संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्या 'ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार 'या ब्रीदवाक्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन झाले. नंतर हस्तकला, रांगोळी, पाककला, पुष्परचना प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. इशस्तवन व स्वागत गीत सौ. निंबकर एस बी यांच्या गीतमंचानेे सादर केले

.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री व सौ संजय बैलकर नायब तहसीलदार सातारा, महाराजा शिवाजी व हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कुडाळचे प्राचार्य मा. श्री व सौ रविंद्र बर्गे उपस्थित होते .कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रशासन श्री व सौ माननीय प्राचार्य डॉ. आर् व्ही. शेजवळ सर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक विद्यालयाच्या प्राचार्या कदम सी.ए. यांनी केले . सूत्रसंचालन श्री पवार ए. आर व प्रा. सौ.गुरसाळे पी जे. यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. सौ. भालेकर ए बी यांनीे केले. यावेळी भवानी विद्यामंदिरचे प्राचार्य माननीय श्री. पाटील सर, माजी प्राचार्य माननीय श्री व सौ. पवार , माननीय श्री शेख सर, माननीय श्री. भालेकर सर, माननीय सौ.खंडागळे मॅडम, माननीय मुक्ता पाटील मॅडम, माननीय सुनीता कदम मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये अर्पिता लोहार या विद्यार्थिनीने आपली कविता सादर करून सर्वांची मने जिंकली. तिचाही सत्कार करण्यात आला.सर्व मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलेचे भरभरून कौतुक केले.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Sat 1st Oct 2022 10:46 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Sat 1st Oct 2022 10:46 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Sat 1st Oct 2022 10:46 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Sat 1st Oct 2022 10:46 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Sat 1st Oct 2022 10:46 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Sat 1st Oct 2022 10:46 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Sat 1st Oct 2022 10:46 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Sat 1st Oct 2022 10:46 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 1st Oct 2022 10:46 am













