साताऱ्यात शिव्यांच्या लाखोलीत रंगला 2 वर्षानंतर बोरीचा बार..
प्रकाश शिंदे- Wed 3rd Aug 2022 09:31 am
- बातमी शेयर करा
लोणंद : राज्यात अनेक भागात वेगवेगळ्या आणि अनोख्या प्रथा आहेत मात्र अशीच एक शिव्या देण्याची अनोखी प्रथा सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात सुखेड आणि बोरी या दोन गावात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते . गेल्या अनेक वर्षापासून सुखेड आणि बोरी या दोन गावातील महिला दोन्ही गावाच्या वेशीवर असणाऱ्या एका ओढ्याच्या ठिकाणी एकत्र जमून एकमेकांना जोरजोरात हात हलवत शिव्या देतात.. या शिव्या खूप वेगळ्या प्रकारच्या असतात..या कोणाला ऐकू येऊ नये यासाठी यावेळी पारंपरिक वाद्य वाजवले जातात या दोन गावातील दोन महिलांची एक जुनी कथा आहे.. बोरी आणि सुखेड गावच्या दोन महिलांची ओढ्यावर भांडणे होऊन त्या मरण पावल्यामुळे ही प्रथा सुरू करण्यात आली आहे असे या ठिकाणच्या महिला सांगतात.. साताऱ्यात सुखेड आणि बोरी या ठिकाणी 'बोरीचा बार' या ठिकाणी शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार हा उत्सव रंगला होता... कोरोनामुळे 2 वर्ष हा अनोखा शिव्यांचा उत्सव आयोजित करण्यात आला नव्हता..यंदा नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी बोरीचा बार आयोजित करण्यात आला.. दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.. उपस्थित महिलांनी नदीच्या दोन्ही बाजूला उभे राहून ढोल ताश्यांच्या आवाजात एकमेकांना हातवारे करत शिव्यांची लाखोली वाहिली..कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता...
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Wed 3rd Aug 2022 09:31 am
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Wed 3rd Aug 2022 09:31 am













