ब्यूटी > दिवाळीत फक्त ३ गोष्टी वापरुन करा झटपट मेकअप, कमी वेळात व्हा तयार- दिसा सुंदर...
Satara News Team
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
- बातमी शेयर करा
दिवाळी म्हटली की खरेदी, घराची साफसफाई, सजावट, दिव्यांची रोषणाई, फराळाचे पदार्थ असे सगळे आपल्या डोळ्यासमोर येते. महाराष्ट्रातील या मोठ्या सणाला एकमेकांना भेटायचे तर आपण सगळ्यांमध्ये उठून तर दिसायला हवे. त्यासाठी आपण आवर्जून मेकअप करतो. आता मेकअप म्हटला की वेगवेगळ्या ब्रँडची बरीच उत्पादने आणि त्यासाठी लागणारा पैसा, वेळ असे सगळेच आले. पण सणावाराच्या दिवसांत कमीत कमी उत्पादनांमध्ये आपण स्वत:चा लूक खुलवू शकलो तर किती छान होईल नाही का? आता हे कसे करायचे यासाठी आज आपण काही खास टिप्स पाहणार आहोत

१. फाऊंडेशन
चेहऱ्याला एकसारखेपणा येण्यासाठी आणि चेहऱ्यावरचे डाग, खड्डे झाकले जाण्यासाठी फाऊंडेशन लावणे अतिशय आवश्यक असते. यामुळे चेहरा हायलाईट व्हायला मदत होतेच पण तो एकसारखा दिसतो. तर एखादं मॅट फिनीशचं लिक्वीड फाऊंडेशन घेऊन ते चेहऱ्यावर सगळीकडे एकसारखं लावावं. डोळ्याखाली अगदी गळ्यालाही या फाऊंडेशनचा चांगला कोट दिला तर चेहरा मस्त दिसतो.

२. काजळ आणि लायनर पेन्सिल
डोळे हायलाईट करण्यासाठी आपण सगळेच काजळ वापरतो. सध्या बाजारात काजळ आणि लायनर एकाच पेन्सिलने लावता येतील अशा बऱ्याच पेन्सिल मिळतात. यामुळे डोळे खुलून येण्यास मदत होते. यामध्ये वेगवेगळ्या रंगाचेही लायनर आणि काजळ तुम्ही आवडत असेल तर ट्राय करु शकता. तुमच्या भुवया फिकट असतील तर हीच पेन्सिल हलक्या आताने भुवयांवरुन फिरवल्यास डोळे आणखी उठून दिसण्यास मदत होते.

३. लिपस्टीक
सणावाराला आणि एरवीही बाहेर पडताना आपण सगळेच लिपस्टीक लावतो. कपड्यांना मॅच होईल अशी आणि समारंभाचा प्रकार लक्षात घेऊन आपण लिपस्टीकच्या शेडची निवड करतो. ही लिपस्टीक लावून झाल्यावर बोटाने तीच शेड थोडी आपल्या चिक बोन्सवर आणि आय शॅडो म्हणून लावल्यास आपल्याला परफेक्ट मेकअप लूक मिळू शकतो.
एखादवेळी आपल्याला प्रवास करुन कुठे जायचे असेल किंवा आपल्याला आवरायची खूप घाई असेल तर एकावेळी जास्त मेकअप प्रॉडक्ट कॅरी करणे, वापरणे शक्य नसते अशावेळी कमीत कमी गोष्टींमध्ये परफेक्ट मेकअप लूक मिळवण्यासाठी या टिप्स नक्कीच उपयोगी पडू शकतात. तेव्हा यंदाच्या दिवाळीत किंवा एरवीही तुम्ही या टिप्स नक्की फॉलो करुन पाहा.
#EasyMakeup
#Diwali
स्थानिक बातम्या
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
संबंधित बातम्या
-
गुरुवारी { उद्या } पहाटे पूर्व आकाशात अनुभवता येणार शुक्र-मंगळ युतीचा नजारा
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
मैत्री एक नातं रक्तापलिकडचं....!
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
दहीहंडीचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा आजचे राशीभविष्य
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
'या' राशींनी आज घ्या काळजी, असा आहे बुधवारचा दिवस
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
वृषभ, कन्या, मकर, मीन राशीच्या लोकांनी मंगळवारी या गोष्टी करू नयेत, जाणून घ्या कसा असेल दिव
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
2 September: 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, धनलाभ होईल
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
सप्टेंबर महिन्याची सुरुवात दमदार होणार, 'या' राशीच्या व्यक्तींना होणार लाभ
- Thu 13th Oct 2022 02:46 pm
-
31 august: ऑगस्ट महिन्याचा शेवटचा दिवस तुमच्यासाठी कसा? वाचा राशीभविष्य
- Thu 13th Oct 2022 02:46 pm













