ज्यांना गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत.....आ. जयकुमार गोरे

माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या

दहिवडी  : येणाऱ्या काळात विरोधकांकडे निवडणुका लढविण्यासाठी पाणी, विकास, एमआयडीसी हे मुद्दे नसून त्यांचा एकच मुद्दा आहे, फक्त जयकुमारला पाडायचंय बस्स. त्यामुळे माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या, ज्यांना गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत असे आव्हान आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधकांना केले आहे 

येणारी विधानसभेची निवडणूक ही पाण्यासाठी लढली जाणारी शेवटची निवडणूक असेल, हा शब्द आहे. माण-खटावचा पाण्याचा दुष्काळ प्रश्न मिटवलेला असेल. त्यामुळे येत्यापुढच्या निवडणुका विकास कामांच्या मुद्द्यावर लढू, असे आमदार जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

माण तालुक्यातील दहिवडी येथे आभार मेळाव्यात ते बोलत होते. जयकुमार गोरे  म्हणाले, ‘‘जिहे- कठापूर सिंचन योजनेचे पाणी उत्तर व पश्चिम माणच्या गावांना जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत पाण्याचा लढा सुरूच राहणार आहे. आजपर्यंत दिलेले सर्व शब्द पाळलेत. जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत पोचत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, हा पण शब्द दिलाय अन् तो पूर्ण करूनच निवडणूक लढवणार आहे. या योजनेतून उर्वरित वंचित गावांना पाणी दिले जाईल.

माढा मतदारसंघात भाजपला अडचणीत आणत जयकुमार गोरेंचे मताधिक्य कसे कमी होईल, यासाठी बारामती, फलटणमधून फिल्डिंग लावली गेली. माझ्याविरोधात इथल्या सर्व नेत्यांना एकत्र करूनही त्यांचा तुम्ही कार्यकर्त्यांनी टिकाव लागून दिला नाही. कार्यकर्त्यांनो, विधानसभा निवडणूक तोंडावर आलीय. आतापासून कामाला लागा, असा सल्ला त्यांनी दिला.

आमदार, खासदार बनायला निघालेल्यांना गावात किती मते मिळाली? याचा विचार करून स्वप्ने पाहावीत. गावात स्मशानभूमी बांधता येत नाही त्यांनी माण- खटावचा आमदार बदलायची स्वप्ने पाहू नयेत, असा टोला जयकुमार गोरे यांनी विरोधकांना लगावला.

विरोधकांकडे निवडणुका लढविण्यासाठी पाणी, विकास, एमआयडीसी हे मुद्दे नसून त्यांचा एकच मुद्दा आहे, फक्त जयकुमारला पाडायचंय बस्स. त्यामुळे माझ्याविरोधात बत्ताशा, खोबऱ्यावरचे पैलवान नको, तगडा उमेदवार द्या,असे आव्हान त्यांनी दिले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, यासाठी कायम आग्रही होतो. भाजप व शिवसेनेच्या सरकारने दहा टक्के आरक्षण दिले आहे, असेही त्यांनी नमुद केले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त