अफजलखानाचं कबरीला मुंबईतून मोगऱ्याचा हार, बॉम्बस्फोटातील आरोपीनंही केला होता मुक्काम

कबरीला मुंबईहून मोगऱ्याचा हार यायचा

प्रतापगड़ : सातारा याठिकाणी भरण्यात येणाऱ्या उरुसामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपशब्द वापरले जात होते, अशीही तक्रार अनेक जण करतात. या कबरीला दररोज मुंबईहून  मोगऱ्याचा हार पाठवला जात होता. 1990 च्या अगोदर याठिकाणी वन विभागाच्या जागेत खोल्या बांधण्यात आल्या. या खोल्यामध्ये 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी राहिल्याचा आरोपही होता.


कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय

सन 2006 ला काही स्थानिक नागरिक आणि हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन करून हे उदात्तीकरण थांबवावं, अशी मागणी केली. सातारा जिल्ह्यातील पाचवड इथं या आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं ही कबर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. गेली 26 वर्षे या ठिकाणी सामान्य नागरिकांना जाता येत नाही, हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

 


अफजल खान कबरीचा इतिहास

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांनी फाडला. त्यानंतर अफजल खान आणि त्याचा अंगरक्षक सय्यद बंडा  याची कबर प्रतापगडच्या पायथ्याशी बांधण्यात आली. सहा फुटांच्या या कबरीवर 1956 पर्यंत कौलारू छप्पर असल्याचे उल्लेख आढळतात. 1980 ते 1985 दरम्यान याठिकाणी अतिक्रमण सुरू झालं. सुरवातीला उरूस भरवून अफजल खानाचं उदात्तीकरण करण्यात आलं तर याठिकाणी उभा करण्यात आलेल्या दर्ग्याचं दर्शन घ्यायची सक्ती काही फकिर करत असल्याच्या तक्रारी अनेक जण करत होते.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त