शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन घरफोडी चोरीचा गुन्हा उघड,
ओमकार सोनावणे
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
- बातमी शेयर करा
सातारा : सातारा शहरातील जुना मोटार स्टैंड मंडईमध्ये कय्युम राजेखान आत्तार रा. सदरबझार सातारा यांचे मालकिचे चिकन सेंटर दि. 16/11/2021 रोजीचे रात्री अज्ञात चोरटयांनी फोडुन घरफोडी केली होती व दुकानातील रोख रक्कम व मोबाईल हॅन्डसेट चोरुन नेला होता. त्याबाबत तक्रारदार यांचे तक्रारीवरुन शाहूपुरी पोलीस ठाणेस गु.र.नं.419/2021 भा.दं.वि.सं.क.454, 457, 380 प्रमाणे घरफोडी चोरीचा गुन्हा दाखल करणेत आला होता.
मा. अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक, सातारा, मा. अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक,
श्रीमती आंचल दलाल सहा. पोलीस अधीक्षक यांनी शाहूपुरी पोलीस ठाणेचे पोलिस निरीक्षक श्री. संजय पतंगे व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. श्री अभिजीत यादव यांना पोलीस ठाणे हद्दीतील घरफोड़ी चोरीचे गुन्हे उघडकीस आणणे बाबत सुचना दिलेल्या होत्या.त्याप्रमाणे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अमलदार गुन्हयातील चोरटयाचा व चोरीस गेले मालाचा शोध घेत असतांना त्यांना सदर गुन्हयातील चोरीस गेले मोबाईल हॅन्डसेटबाबत तांत्रिक माहीती प्राप्त झाली. सदर माहीतीचे आधारे गुन्हे शाखेने सदरचा गुन्हा उघडकिस आणला असुन सदरची घरफोडी चोरी ही एका अल्पवयीन बालकाने केली असल्याचे निष्यन् झालेने त्यास ताब्यात घेणेत आले. सदर गुन्हयात चोरीस गेलेला मोबाईल हॅन्डसेट सह अजुन एक मोबाईल व रोख रक्कम असा एकुण 11,000/-- रुचा मुद्देमाल हस्तगत करणेत आला आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस फौजदार श्री.ए.आर. जगदाळे हे करीत आहेत.
अशा प्रकारे शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकिस आणुन गुन्हयातील चोरीस गेलेला मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम असा एकुण 11,000/- रु. कि.चा ऐवज हस्तगत केला आहे.
सदरची कारवाई मा. अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक, सातारा. मा. अजित बो-हाडे अपर पोलीस अधिक्षक श्रीमती आँचल दलाल सहा.पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पतंगे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पो. हेड. कॉ. हसन तडवी, लेलेश फडतरे, पो.ना. अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो.कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली आहे.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 16th Jul 2022 02:37 pm
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Sat 16th Jul 2022 02:37 pm













