आज शुक्रवार १९ ऑगस्ट जाणुन घ्या आपले राशिभविष्य ,शुभ अशुभ वेळ

आजचा शुभ मुहूर्त १९ ऑगस्ट २०२२ : अभिजित मुहूर्त दुपारी ११ वाजून ५८ मिनिट ते १२ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी ०२ वाजून ३५ मिनिट ते ०३ वाजून २८ मिनिटांपर्यंत. निशीथ काल मध्यरात्री १२ वाजून ०३ मिनिट ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ०६ वाजून ४४ मिनिट ते ०७ वाजून ०८ मिनिटांपर्यंत. अमृत काळ मध्यरात्री ११ वाजून १६ मिनिट ते ०१ वाजून ०१ मिनिटांपर्यंत.

शुक्रवार, १९ ऑगस्ट २०२२
{आज ज्यांचे वाढदिवस किंवा लग्नाचे वाढदिवस असतील त्यांना खूप खूप शुभेच्छा व आशीर्वाद }

राहूकाळ पुर्वान्ह १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. अष्टमी तिथी रात्री ११ वाजेपर्यंत. त्यानंतर नवमी तिथीची सुरुवात. कृतिका नक्षत्र अर्धरात्रीनंतर ०१ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्राची सुरुवात.

मेष
आज पारिवारिक, कौटुंबिक सौख्याचा आनंद घ्याल. कुटुंबीयांसमवेत वेळ मजेत जाईल. बाहेर फिरायला जाण्याचे बेत आखाल.

वृषभ
आजचा दिवस आपल्यासाठी नवीन उत्साह,ऊर्जा,उमेद यांनी परिपूर्ण असेल. आज आपल्या मनातील इच्छांची पूर्तता होईल. आजच्या दिवसाचा सदुपयोग अवश्य करा.

मिथुन
आज काही गोष्टी मनाविरुद्ध घडण्याची शक्यता राहील. काही अनावश्यक खर्च देखील संभवतात. खर्चाचा योग्य ताळमेळ साधावा.

कर्क
आजचा आपला दिवस लाभ, यश, आनंदाची प्राप्ती करणारा असेल. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न कराल. मित्रमंडळींसमवेत दिवस मजेत जाईल.

सिंह
आपल्यातील बुद्धिमत्ता व व्यवहार कौशल्य यांचा योग्य वापर करत आज कार्यसिद्धी साधाल. संपूर्ण दिवस कार्यमग्न असाल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.

कन्या
आजच्या दिवशी भाग्याची, सौख्याची, आनंदाची प्राप्ती कराल. आपल्यातील कलाकौशल्य, रसिकता, मधुरता यांचा योग्य ताळमेळ साधत मजेत दिवस घालवाल.

तुळ
आजच्या दिवशी काहीसे मानसिक अस्थैर्य जाणवेल. आपल्यातील ताकद, धडाडी,शौर्य यांचा अतिरेक टाळावा .अन्यथा मनस्ताप, पश्चाताप होऊ शकतो.

वृश्चिक
आजचा आपला दिवस उत्साही, आनंदी असेल. वैवाहिक जोडीदाराला मनासारखा वेळ द्याल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत देखील विचारात घ्याल.

धनु
आजचा दिवस काहीसा कष्टप्रद राहू शकतो. मात्र आपण आपल्या नित्य कर्मावर लक्ष ठेवून आजचा दिवस व्यतीत करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

मकर
आज आपल्या बुद्धिचातुर्याने दिवस आनंदात, मजेत व्यतीत कराल. एक नावीन्यपूर्ण उत्साह व उमेद आज आपल्यात असेल. संतती सौख्य देखील लाभेल.

कुंभ
आजच्या दिवशी उत्तम गृह सौख्याची प्राप्ती होईल. आज घरातील सर्वांची काळजी घ्याल. घरातील बऱ्याच दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे आज झपाट्याने पूर्ण कराल.

मीन
आज आपल्यातील धाडसी, उत्साही स्वभावाचा योग्य उपयोग करत काही महत्वपूर्ण निर्णय घ्याल. आपल्या बुद्धिमत्तेला आज कर्तुत्वाची जोड देखील लाभेल.

 

आजचा अशुभ मुहूर्त १९ ऑगस्ट २०२२ :

राहूकाळ सकाळी १० वाजून ३० मिनिट ते १२ वाजेपर्यंत. दुपारी ०३ वाजून ३० मिनिट ते ०४ वाजून ३० मिनिटांपर्यंत यमगंड असेल. सकाळी ०७ वाजून ३० मिनिट ते ०९ वाजेपर्यंतगुलिक काळ असेल. दुर्मुहूर्त काळ सकाळी ०८ वाजून २९ मिनिट ते ०९ वाजून २१ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५१ मिनिट ते ०१ वाजून ४३ मिनिटांपर्यंत.

 

सौ . कांचन थिटे 
ज्योतिष, अंक वास्तू शास्त्र प्रवीण, विवाह (M.S), वास्तू तज्ञ, 

संपर्क  :  9657836393 
तडवळे रोड, नवीन S.T. स्टँड जवळ, कोरेगाव, सातारा

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त