आरक्षण तर आपण दहा दिवसांत घेणारच, फक्त जातीला डाग लागता कामा नये; मनोज जरांगेंचा एल्गार

अंतरवाली सराटी: केंद्राला हात जोडून विनंती आहे, गोरगरीब समाजाचे हाल करू नका.केंद्र आणि राज्य सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. आम्ही दहा दिवसांपेक्षा जास्त वाट पाहू शकणार नाहीत. ५००० पुरावे मिळाल्याने आता आरक्षण समितीचे काम बंद करा, असे आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केले. तसेच सरकारकडे आणखी दहा दिवस आहेत, येथे आलेल्या लाखोंच्या जनसागराचे एकचे मागणे आहे, मराठ्यांना आरक्षण द्या. या दहा दिवसात आरक्षण पाहिजेच, जर तुम्ही नाही दिले तर चाळीसाव्या दिवशी सांगू पुढे काय करायचे, त्यानंतर सरकार जबाबदार राहील, असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला. 

अंतरवाली सराटी येथील सभेला लाखोंचा जनसमुदाय उपस्थित होता.जरांगे पुढे म्हणाले, गोरगरीब मराठ्यांनी मोठे केलेले राजकारणी आम्हाला विचारतो सभेसाठी पैसे कोठून आला. १२३ गावांतील फक्त २३ गावांतून २१ लाख जमा झाले.लोकांनी पैसे दिले आहेत. एवढ्या मोठ्या नेत्याला काय बोलावे ते कळायला हवे. अजित पवार यांनी त्यांना समज द्यावी, असे आवाहन छगन भुजबळ यांचे नाव न घेता जरांगे यांनी केले. तसेच गुणरत्न सदावर्ते यांना देखील समज देण्याचे आवाहन देवेंद्र फडणवीस यांना केले. मराठे दिलेला शब्द मोडत नाही. सभेसाठी आलेला समाज शांततेत आला आणि शांततेच जाणार. पोलिस प्रशासनाने आपल्याला सहकार्य केले आपण त्यांना सहकार्य  करावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. 

गेल्या काही दिवसापासून अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पाटील यांनी सरकारला ४० दिवसांचा वेळ दिला आहे. या पार्श्वभूमीवर आज अंतरवली सराटी येथे भव्य सभेचे आयोजन केलं आहे. १०० एकर जागेत ही सभा होणार आहे. या सभेसाठी राज्यभरातून मराठा बांधव आले आहेत. या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रीया दिली. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले, मराठा समाजाची आज १२ वाजता सभा सुरू होणार आहे. ही गर्दी आमच्या वेदना आहेत. मुल शिकून मोठी होतात पण नोकरीपासून वंचित राहत आहेत. आमच्यासाठी हा सुवर्णक्षण आहे. राज्यातील मराठा समाज एकत्र आलाय. सरकारच्या हातात आजपासून दहा दिवस आहेत. आज मराठा समाज शांततेत आला आणि शांततेत गेला, हा पायंडा आम्ही पाडणार आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, राहिलेल्या दहा दिवसात सरकारने आरक्षण दिले पाहिजे. आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला. 

"आता सभेला आलेली गर्दी पाहून आकडा सांगणे कठीण आहे. सभेसाठी जमलेली गर्दी ही सगळी वेदना आहे. या समाजाचा प्रश्न सरकारने मार्गी काढावा. दहा दिवस राहिले आहेत, आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही. आज सभा संपल्यानंतर समाज शांततेत घरी जाणार आहे, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही शेतकरी आहोत, सामान्य घरातील आम्ही आहोत. आम्ही या सभेचे नियोजन एकत्र येऊन केलं आहे. राज्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा स्वार्थासाठी म्हणायचं, असा आरोपही केला. समाजातील मनातील भूमिका मा मांडत आहे. ही गर्दी त्यासाठीच आली आहे. सगळ्यांनी समाजासोबत राहिले पाहिजेत. गोरगरीब मुलांचं चांगलं झालं पाहिजे, असंही जरांगे-पाटील म्हणाले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला