मी नितीन काकाला खासदार करतो, नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही. हे वक्तव्य तंतोतंत पाळले

सातारा: लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान नितीन काकांना मी खासदार करतो असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाई येथील सभेत दिला होता. तो त्यांनी पाळल्याने शब्दाचा पक्का वादा अजित दादा ही म्हण पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिली आहे.

 

लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उमेदवार उभा राहील, अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतली होती. महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या वाट्याला आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बदल्यात राज्यसभेची जागा भारतीय जनता पार्टीकडे मागितली होती. ही जागा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला मिळाली असून या जागेवर आता नितीन काका पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यामुळे वाईसह राष्ट्रवादीच्या गोटात आनंद द्विगणित झाला आहे.

 

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाई येथील सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर वक्तव्य केले होते की, महायुतीच्या उमेदवारांना तुम्ही प्रचंड मताने विजयी करा, मी नितीन काकाला खासदार करतो, नाहीतर पवारांची अवलाद सांगणार नाही. हे वक्तव्य तंतोतंत पाळले असून शब्दाचा पक्का वादा अजितदादा याची प्रचिती पुन्हा सातारा जिल्ह्याने अनुभवली आहे.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त