गस्तीला बाहेर पडलेल्या तालुका पोलिसांना यवतेश्वर घाटात प्रेमीयुगूलांनी चक्रावून सोडले.

सातारा : सातारा शहर व परिसरात यवतेश्वर घाटात गस्तीला बाहेर पडलेल्या पोलिसांना प्रेमीयुगूलांनी चक्रावून सोडले. सुनसान आणि अंधारा असलेल्या यवतेश्वर घाटातील कठड्यांवर प्रेमी युगूल बिनधास्त बसलेले पोलिसांना आढळून आले. विशेष म्हणजे काही अल्पवयीन मुलीही क्लास आणि मैत्रीणींच्या नावाने येथे सापडल्याने पोलीसही अवाक झाले.

सातारा शहर व परिसरात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमागे बेफाम वेग हे प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर बेदरकार वाहन चालविणाऱ्यांवर कारवाइ करण्याच्या उद्देशाने यवतेश्वर घाटातून मार्गस्थ होणाऱ्या पाेलिसांच्या गाड्या प्रेमीयुगूलांना पाहून थांबले. रात्री उशीरा घराबाहेर कसे सोडले या प्रश्नावर युगूलांनी दिलेली उत्तरे धक्कादायक होती. आवश्यक माहिती घेतल्यानंतर पालकांना बोलावून या युगूलांना सोडण्यात आले.

गस्तीच्या दरम्यान आढळून आलेल्या महिलांकडे रात्री उशीरा काय सांगून घराबाहेर पडला ?

यवतेश्वर घाटातील कठड्यावर रात्री उशीरा बसणाऱ्यांमध्ये महिला आणि मुलींचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. गस्तीच्या दरम्यान आढळून आलेल्या महिलांकडे रात्री उशीरा काय सांगून घराबाहेर पडला असे पोलिसांनी विचारले. त्यावर काही तरूणींनी एकस्ट्रा क्लास आहे, मैत्रीणीबरोबर खरेदी करायला बाहेर आलोय, मैत्रीणीच्या घरी बसून अभ्यास करतोय अशी कारणे सांगितली. यातील धक्कादायक बाब म्हणजे रात्री नऊ पर्यंत घराबाहेर असलेल्या अल्पवयीन मुलींच्या बाबतही पालक निश्चिंत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आव्हान  
 
रात्रीच्यावेळी बेदरकारपणे गाडी चालविणाऱ्यांवर आळा बसविण्याच्या उद्देशाने गस्त घालत असताना यवतेश्वर घाटात प्रेमीयुगूले आढळून आली.  अंधारात नशेच्या अंमलाखाली असणाऱ्यांकडून तरूणींच्या बाबत चुकीचे काहीही होऊ शकते याचे भान तरूणांसह कुटूंबियांनीही ठेवावे. रात्री उशीरा मुलींना निर्जनस्थळी जाण्यापासून पालकांनीही अटकाव करावा.

विश्वजीत घोडके, तालुका पोलीस निरिक्षक

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला