टोलनाके स्थलांतरित करा अन्यथा पूर्णतः सूट द्या....खा. श्रीनिवास पाटील
Satara News Team
- Tue 8th Aug 2023 11:36 am
- बातमी शेयर करा
कराड : राष्ट्रीय महामार्गावरील आनेवाडी व तासवडे येथील टोलनाके जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करा किंवा या दोन्ही टोलनाक्यावरील टोलमध्ये सातारा जिल्ह्यातील जनतेला पूर्णतः सूट द्या, अशी जोरदार मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी संसदेत केली. लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून खासदार श्रीनिवास पाटील यांनी नियम 377 नुसार तातडीचे व लोकहितासाठी महत्वाचे मुद्दे सादर करून सभागृहाच्या पटलावर ठेवले. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, महामार्गावर पडलेले खड्डे, संथगतीने सुरू असलेले खंबाटकी बोगदा व सहापदरीकरणाचे काम, प्रलंबित असलेले उड्डाणपूल तसेच टोलनाक्याच्या समस्यांवर प्रश्न उपस्थित करत ही मागणी केली.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, सातारा लोकसभा मतदारसंघात आनेवाडी आणि तासवडे असे दोन टोलनाके आहेत. सातारा जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या नागरिकांना कामाच्या निमित्ताने दिवसातून दोन-चार वेळा या दोन्ही टोलनाक्यांवरून जावे लागते. या दोन्ही टोलनाक्यांवर 75 रुपयांपासून 425 रुपयांपर्यंतचा कर वाहनधारकांडून वसूल करण्यात आला आहे. मात्र, वसूल केलेल्या कर उत्पन्नानुसार दिल्या जाणाऱ्या सुविधा मात्र खूपच कमी आहेत. जसे रुग्णसेवा, क्रेन, शौचालय, रात्रीच्या वेळी विद्युत प्रकाश आणि इतर अत्यावश्यक सेवा वाढविण्याची गरज आहे. खरतर हे दोन्ही टोलनाके सातारा जिल्ह्याच्या हद्दीवर स्थलांतरित करण्याची गरज आहे. तसे करता येत नसेल तर सातारा जिल्ह्यातील जनतेला या दोन्ही टोलनाक्यांवर टोलमध्ये संपूर्ण सूट दिली जावी.
यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावरील पुणे ते सातारा आणि सातारा ते कोल्हापूर या भागावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. मार्गाची दुरावस्था झाल्यामुळे अपघाताच्या घटना घडत आहेत. प्राधान्याने खड्डे बुजवून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे. तसेच रस्ता पूर्णपणे अपघातमुक्त करावयाचा असेल तर हे खड्डे आधुनिक तंत्रज्ञानाने बुजवणे गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्ग एन.एच. 4 चे चौपदरीवरून सहापदरीकरण करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून संथगतीने सुरू आहे. सातारा ते पुणे विभागाचे काम पूर्ण होण्यास अजून किती कालावधी लागणार आहे? तसेच खंबाटकी बोगद्याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, असा सवाल त्यांनी केला. खंडाळा तालुक्यातील पारगाव आणि शिरवळ येथील उड्डाणपूल तसेच वेळे येथे ग्रामस्थांना रस्ता ओलांडण्यासाठी उड्डाणपूल बांधण्याची मागणी केली आहे. सदरच्या उड्डाणपूलांची कामे लवकर सुरू करावीत अशी मागणीही खासदार श्री. पाटील यांनी यावेळी केली आहे.
स्थानिक बातम्या
खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"
- Tue 8th Aug 2023 11:36 am
शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?
- Tue 8th Aug 2023 11:36 am
नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू
- Tue 8th Aug 2023 11:36 am
सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत
- Tue 8th Aug 2023 11:36 am
संबंधित बातम्या
-
पुणे पदवीधर निवडणुकीत महायुतीची ताकद वाढली; शरद लाड, भैय्या माने डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारात सक्रिय
- Tue 8th Aug 2023 11:36 am
-
मतदारसंघ पुनर्रचना अजून झालीच नाही; मग शशिकांत शिंदेंची मुंबईत ‘राजकीय मोर्चेबांधणी’ कशासाठी?
- Tue 8th Aug 2023 11:36 am
-
राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल
- Tue 8th Aug 2023 11:36 am
-
कदमांना “ससा” म्हणत सपकाळांनी टोला मारला; पण आंबेघरचा पराभव आठवताच सोशल मीडियाने सपकाळांनाच घेरले!
- Tue 8th Aug 2023 11:36 am
-
स्वातंत्र्यदिनी महाबळेश्वरच्या स्वच्छता व पाणीपुरवठ्याला नवी ताकद!
- Tue 8th Aug 2023 11:36 am
-
आखाडे ठरावाचा राग अनावर; राजे गटाच्या कार्यकर्त्यावर हल्ला, मेढा पोलीस ठाण्यात राजकीय नेत्यांची गर्दी!
- Tue 8th Aug 2023 11:36 am
-
भाजप बैठकीत वादाचा भडका; गोळे–मानकुमरे आमनेसामने, हातगेघर ठरावावरून आरोप-प्रत्यारोप
- Tue 8th Aug 2023 11:36 am













