पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीला पेटवले
Satara News Team
- Sat 11th May 2024 11:05 am
- बातमी शेयर करा
सातारा : पतीने मागितलेले पैसे देण्यास नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीच्या अंगावर स्टोव्ह मधील डिझेल टाकून तिला पेटवण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक प्रकार रामकुंड, ता. जि. सातारा येथे घडला आहे. हा प्रकार 9 मे रोजी दुपारी तीनच्या दरम्यान घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, याप्रकरणी नेहा सुरज माने वय 23 राहणार रामकुंड तालुका जिल्हा सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज राजू माने यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. सुरज माने यांनी आपल्या पत्नीकडे काही कारणास्तव पैसे मागितले. पैसे नसल्याचे सांगितल्याने चिडलेल्या सुरज माने यांनी चिडून जाऊन पत्नीच्या अंगावरच स्टोव्हमधील डिझेल टाकून काडीने पेटवले. फिर्यादीने आरडाओरडा केल्याने आरोपीने फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतले.
या आगीमध्ये फिर्यादीच्या गालाला व दोन्ही पायाला भाजले. फिर्यादी स्वतः रिक्षाने सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध तक्रार दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. आय. शितोळे अधिक तपास करत आहेत.
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Sat 11th May 2024 11:05 am
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Sat 11th May 2024 11:05 am
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Sat 11th May 2024 11:05 am
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Sat 11th May 2024 11:05 am
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Sat 11th May 2024 11:05 am
संबंधित बातम्या
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 11th May 2024 11:05 am
-
पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात
- Sat 11th May 2024 11:05 am
-
पॅरोलवर सुटलेला खुनातील फरार आरोपी चार वर्षांनंतर साताऱ्यात जेरबंद
- Sat 11th May 2024 11:05 am
-
सातारा पोलिसांची धडक कारवाई; सुमारे १९ लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 11th May 2024 11:05 am
-
गुणवरेचा गांजा उत्पादक शेतकरी अंकुश कोळेकर ला फलटण ग्रामीण पोलिसांनी गांजा सह घेतले ताब्यात.
- Sat 11th May 2024 11:05 am
-
पुसेगाव पोलिसांची मोठी कारवाई; खटाव जवळील मळवी शिवारात हातभट्टीवर छापा, १ लाख १ हजारांचा मुद्देमाल जप्त!
- Sat 11th May 2024 11:05 am
-
स्थानिक गुन्हे शाखा व वडूज पोलिसांची धडाकेबाज कारवाई; 17.09 लाखांचा बेकायदेशीर स्फोटकसाठा जप्त
- Sat 11th May 2024 11:05 am
-
चैन स्नॅचिंग करणारे सराईत गुन्हेगार यांना ढेबेवाडी पोलीस यांनी केली अटक
- Sat 11th May 2024 11:05 am













