शेणोली च्या माहेरवाशीण यांचे हस्ते अकलाई देवी आक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण

 कराड : आपल्या शेणोली गावचे ग्रामदैवत श्री अकलाई देवी चे मूळ स्थान डोंगरामध्ये असून  या परिसरामध्ये वृक्षारोपण प्रेमी अकलाई देवी  ऑक्सिजन पार्क निर्मिती केली जात आहे. गावातील युवकांनी गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी श्री आकलई देवी मंदिर परिसरामध्ये हजारो वृक्षांची लागवड केली आहे. यावर  न थांबता रोज सकाळी या वृक्षांची निगा व स्वच्छता राखण्याची जबाबदारी घेऊन असे आक्सिजन पार्क निर्माण करीत आहे.
  गावातील अकलाई देवी आक्सिजन ग्रुपच्या वृक्षारोपणाच्या तसेच आपली आपल्या माहेराशी असलेली नाळ अविरत जपून ठेवण्याच्या उद्देशाने व निसर्गाचे संवर्धन झाले पाहिजे व कामास प्रेरणा व पाठबळ देण्याच्या उद्देशाने
 शेणोली गावातील माहेर वाशीन महीला मुली ग्रुप यांनी आज श्रावणी तिसऱ्या मंगळवारचे औचित्य साधून श्री अकलाई देवी ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षारोपण  केले  तसेच झाडांना राखी बांधून निसर्गाशी एक अनोख घट्ट नातं  तयार झालं आहे. या उपक्रमाकरिता  वनविभाग महाराष्ट्र शासनाचे अधिकारी
 वनपाल श्री  जगताप साहेब वनरक्षक सौ. खंडागळे व वनसेवक श्री श्रीकांत मदने व आकलाई देवी आक्सिजन पार्क ग्रूपतर्फे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला