बलवंत पाटील यांना पुस्तकेंना दाखवून द्यायचे होते, की तू शेर है, तो मै सव्वाशेर हूं
मंगेश कुंभार - Tue 22nd Nov 2022 10:02 am
- बातमी शेयर करा
सातारा : शिक्षक बँकेच्या राजकारणातून सिद्धेश्वर पुस्तकेंना बाजूला ठेवण्यात समितीच्या मदतीने संभाजीराव थोरात, बलवंत पाटील यांना यश आले, तरीही पुस्तकेंच्या पॅनेलने चार जागा जिंकत बँकेत अस्तित्व ठेवले आहे. बँकेत सत्ता परिवर्तन झाले, आता सभासदांनी संघ, समितीच्या संचालकांवर टाकलेल्या विश्वासास खरे उतरण्याच्या परीक्षेत पास व्हावे लागणार आहे. या जोडगोळीच्या कारभारावर पुस्तके गटाच्या संचालकांनी लक्ष ठेऊन त्यांना चुकीच्या निर्णयापासून रोखले तरच शिक्षकांच्या या अर्थवाहिनीची वाटचाल उज्ज्वल होणार आहे.प्राथमिक शिक्षक बँकेत संघ- समितीच्या युतीने सत्तांतर घडविले. प्रत्येक निवडणुकीत शिक्षक बँकेचे सुज्ञ मतदार सत्ता बदल करतात, त्यामुळे यावेळी काही वेगळे झाले नाही. संघाच्या नेत्यांना यावेळेस पुन्हा बँकेची सत्ता ताब्यात राहावी, असे वाटत होते; पण संघातील दुफळीने नेत्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. याला अनेक कारणे आहेत. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे सिद्धेश्वर पुस्तकेंनाच संघातील संभाजीराव व बलवंत पाटील यांचा विरोध होता.आजपर्यंत (कै.) शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात या नेत्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक संघाची वाटचाल राहिली. मध्यंतरीच्या काळात संघातील नेत्यात श्रेयवाद रंगला. यातूनच सिद्धेश्वर पुस्तके यांनी बाजूला होत पुरोगामी शिक्षक संघ स्थापन केला; पण शिक्षक बँकेच्या इतिहासात संघाच्या नेत्यांत कितीही वाद असला, तरी संघाचे एकच पॅनेल राहिले. संभाजीराव थोरात यांनी पुस्तकेंना बाजूला ठेवून आपण संघाचे स्वतंत्र पॅनेल करू, अशी भूमिका घेतली होती; पण संघातील शिवाजीराव पाटील यांच्या गटातील लोकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे संभाजीराव थोरात यांनी समितीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. यामागे सिद्धेश्वर पुस्तके यांच्याशी वाद झालेले बँकेचे माजी अध्यक्ष बलवंत पाटील यांची रणनीती होती. बलवंत पाटील यांना पुस्तकेंना दाखवून द्यायचे होते, की तू शेर है, तो मै सव्वाशेर हूं.. यातूनच त्यांनी संघ- समितीचे सभासद परिवर्तन पॅनेल स्थापन केले. या पॅनेलचे नेटके नियोजन आणि आर्थिक ताकद बलवंत पाटील यांनी दिली. त्यामुळे समितीची ताकद वाढली.
स्थानिक बातम्या
कोयना जलाशय परिसरातील ५०० दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत... जयकुमार गोरेंचा तोच अहंकार भाजपला नडणार ?
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
चोराडे येथे विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला वनविभागाने दिले जिवदान.
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
वर्दीतील दर्दी! कष्टकरी महिलांची दिवाळी गोड करणारे पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर.
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
मसूर पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली?
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
डॉ. स्मिता जाधव यांचा सातारा ,रहिमतपूर कराड,पाटण येथे उद्या झंझावात
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Tue 22nd Nov 2022 10:02 am
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Tue 22nd Nov 2022 10:02 am













