राष्ट्रवादीच्या अजित दादा गटाचे सातारा, जावळीचे कारभारी ठरले

जावळी : राष्ट्रवादी काँग्रेसच्याअजित पवार गटाच्या पदाधिकारी निवडींना सुरुवात झाली असून सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर आणि जावळी अध्यक्षपदी साधू चिकणे यांची निवड करण्यात आली आहे. तर सातारा शहराध्यक्षपदी अॅड. बाळासाहेब बाबर यांची वर्णी लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेनुसार विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी करण्यात आल्या. तर जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि कार्याध्यक्ष अमित कदम यांच्या अध्यक्षतेखाली निवडी पार पडल्या आहेत. सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी निवडी जाहीर करुन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

पक्षाच्या सातारा तालुकाध्यक्षपदी शशिकांत वाईकर, जावळी तालुकाध्यक्षपदी साधू चिकणे यांची निवड करण्यात आली. याबाबत त्यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. तसेच पक्षाच्या इतर विभागांच्या निवडीही जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार महिला आघाडीच्या सातारा शहराध्यक्षपदी संगिता देशमुख, अल्पसंख्यांक विभाग सातारा तालुकाध्यक्षपदी शमशुद्दीन सय्यद (कोंडवे), ओबीसीच्या विभागाच्या सातारा शहराध्यक्षपदी संजय बनकर यांची निवड करण्यात आली आहे. तर सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघ अध्यक्षपदी रवींद्र शेलार, कार्याध्यक्षपदी महेश पाटील आणि सातारा जिल्हा चिटणीसपदी प्रकाश कदम यांची निवड झाली आहे.

राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस श्रीनिवास शिंदे, जावळी सहकारी बॅंकेचे संचालक योगेश गोळे, प्रकाश कोकरे, शिवाजीराव देशमुख, वैशाली सुतार, संदीप भोसले यांच्या उपस्थितीत या निवडी झाल्या.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com
esataranews.com

स्थानिक बातम्या

सातार्‍यातील  कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

सातार्‍यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

सातारा जिल्हा पोलीस क्रीडा प्रबोधिनीमधील यश निकम,समृद्धी शिंदे यांची आशियाई बॉक्सींग क्रीडा स्पर्धांमध्ये ऐतिहासीक कामगीरी

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात  गुन्हा दाखल.

मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त