किल्ले अजिंक्यताऱ्यावर दक्षिण महादरवाजाचा लोकार्पण सोहळा आमदार शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत
Satara News Team
- Mon 15th May 2023 01:07 pm
- बातमी शेयर करा
सातारा : किल्ले अजिंक्यताऱ्यावर दक्षिण महादरवाजाचा लोकार्पण सोहळा आमदार शिवेंद्रराजेंच्या उपस्थितीत व वीरमाता, वीर पत्नी यांच्या हस्ते शानदार पार पडला. हर हर महादेव, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा, भंडाऱ्याची उधळण करत ढोलतांशाच्या आवाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली. राजसदरेवर नजरेचे पारणे फेडणारे मर्दानी खेळ पार पडले. तेथेच वीरमाता, वीर पत्नींचा गौरव राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने करण्यात आला.
गेले सात ते आठ महिन्यांपासून किल्ले अजिंक्यतारा येथे दक्षिण महादरवाजाच्या संवर्धनाचे कार्य राजा शिवछत्रपती परिवाराकडून सुऊ होते. रविवारी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दक्षिण दरवाजाच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन केले होते. सकाळीच या सोहळ्यानिमित्ताने मुख्य दरवाजाजवळ राज्यभरातून आलेल्या राजा शिवछत्रपती परिवाराच्या कार्यकर्त्यांनी भंडाऱ्याची उधळण करत गंधर्व ढोल पथकाच्या तालावर मिरवणूक पुढे पायऱ्यातून राजसदरेवर पोहोचले. या मिरवणुकीमध्ये राज्यभरातून आलेले शिवभक्त, महिला यांचा सहभाग होता. त्यामध्ये अनेकांनी पारंपरिक पोशाख परिधान केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणी ताराराणी, येसूबाई, राजमाता जिजाऊ यांचे पोशाख परिधान केले होते. बाल शिवबाही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. राजसदरेवर तब्बल दोन तास मर्दानी खेळाचे सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये दांडपट्टा, भाले, तलवारबाजी, लाठीकाठी, लिंबू कापणे आदी खेळाने चित्तथरारक लक्ष वेधून घेतले. दरम्यान, राजसदरेवरच भारत-पाक, भारत-चीन, कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या वीर पत्नी, वीर माता यांचा सत्कार ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांच्याकडून यथोचित सत्कार करण्यात आला. तेथून वाजतगाजत दक्षिण दरवाजाकडे छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी नेण्यात आली. दक्षिण दरवाजाच्या ठिकाणी महिलांच्या हस्ते औक्षण करत शिवगादर म्हणत पालखीचे स्वागत करण्यात आले. फुलांनी सजवलेल्या दरवाजाचे लोकार्पण आमदार शिवेंद्रराजे यांच्या उपस्थितीत वीरमाता, वीरपत्नींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गगनभेदी घोषणा देण्यात आल्या.
स्थानिक बातम्या
पुसेसावळी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ तानाजी धुमाळ यांचा ‘मीटर चोरी’चा धुमाकूळ?
- Mon 15th May 2023 01:07 pm
नोकरीवरून काढल्याच्या रागातून आंदोलनाचा प्रयत्न; CPR देत जवानांनी वाचवले प्राण, रुग्णालयात उपचार सुरू
- Mon 15th May 2023 01:07 pm
औंध पोलिस ठाण्याचे प्रभारींना मंथलीचा पैसा की अधिकृत मोबदला?
- Mon 15th May 2023 01:07 pm
जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?
- Mon 15th May 2023 01:07 pm
फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी
- Mon 15th May 2023 01:07 pm
सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती
- Mon 15th May 2023 01:07 pm
संबंधित बातम्या
-
महेश गाडे यांच्या पुढाकारातून सैदापूरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्र्यांचे वाटप
- Mon 15th May 2023 01:07 pm
-
सात कोटींचे काम, वर्षभराची दिरंगाई! कुडाळमध्ये रस्ता-गटरचे अर्धवट काम
- Mon 15th May 2023 01:07 pm
-
पाचगणीतील कचरा प्रकरणाने स्वच्छता ठेकेदाराच्या कामावर प्रश्नचिन्ह; करारातील जबाबदाऱ्या पाळल्या का?
- Mon 15th May 2023 01:07 pm
-
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Mon 15th May 2023 01:07 pm













