सातारा जिल्ह्यात मान्सूनच्या सरी लागल्या बरसू.

पावसामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण

 सातारा न्यूज : संपूर्ण जून महिना जडी मारून बसलेल्या मान्सूनच्या पावसाने मात्र आज शुक्रवारी पहाटेपासून आपली हजेरी सातारा जिल्ह्यात सर्व दूर लावली आहे. रात्री उशिरा सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकरी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
 कृषी खात्याच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण पाऊस सुरू झाल्याशिवाय शेतीची कामे, मशागती अथवा पेरण्या करू नका असा आदेश मागील मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी स्वतः दस्तूर खुद्द दिल्यामुळे अनेक पेरण्या रखडल्या आणि पाऊसही लांबल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये मोठे चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र केवळ काळे गडद रंगाचे ढग आकाशातून पळताना लांबलेला पाऊस, वाढत्या उन्हाची तगमग यामुळे पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यांना मात्र तोंडचे पाणी पळवावे लागले होते. मात्र ,आता सुरू झालेल्या या मान्सून पावसाने संपूर्ण चित्रच बदलले असून सातारा शहर परिसरामध्ये सखल भागामध्ये पावसाची डबकी साचली आहे. तर घरोघरी अडगळीत ठेवलेल्या रेनकोट, छत्री यांच्या पिशव्या आता बाहेर निघाले आहेत.   सातारा जिल्ह्यात   पावसामुळे पूर्णपणे पावसाळी वातावरण दिसून येत आहे .
सध्या सातारा जिल्ह्यात मार्गक्रमण करणाऱ्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातही या मान्सून सरी बर असल्यामुळे वारकऱ्यांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण पसरले आहे. आज फलटण येथे दोन दिवसाच्या मुक्कामासाठी पालखी विसावली तरीसुद्धा वारकऱ्यांनी पावसामुळे चिखल आणि दलदलीतही आपली जागा शोधत दोन दिवसाच्या निवाऱ्यासाठी सोय केलेली दिसून येत होती.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य

खाकी वर्दीतील दुर्गा - SRPF च्या पहिल्या महिला प्राचार्य "जयश्री देसाई"

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

शामगाव घाटात कार्यरत मसूर चे वाहतूक पोलिस कि सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकणारी टोळी?

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

जिल्हा प्रशासनाचे आदेश कागदावर, NHAI चे दुर्लक्ष! सातारा-लोणंद मार्गावरील 'सगळी गावे' उतरणार रस्त्यावर; २४ तासांत अंमलबजावणी न झाल्यास 'काम बंद' आणि 'महा-रस्ता रोको'चा इशारा!

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू — वनविभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा ...रयत क्रांती संघटनेची मागणी

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

नहाळेवाडी हादरली धरासमोर खेळणाऱ्या अडीच वर्षांच्या बालकाला बिबट्याने उचलले; दुर्दैवी मृत्यू

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

सातारा पोलिसांची मोठी कामगिरी; ४४९ नागरिकांना चोरीचे, हरवलेले मोबाईल परत

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला