भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सातारा  : सातारा येथे शंभूराजे देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा व संजयसिंह येनपुरे विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र अतिरिक्त कारभार यांच्या उपस्थितीत सातारा जिल्हा पोलीस दलातील अधिकारी यांची बैठक पार पडली समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांनी जिल्ह्यातील पोलीस स्टेशनचा कामाचा आढावा घेतला. तेव्हा ऑक्टोंबर 2022 मध्ये सर्वात जास्त चोरीस गेलेली मालमत्ता हस्तगत करून जिल्ह्यातील सर्वोत्तम कामगिरी करून द्वितीय क्रमांक पटकावला त्याच्याबद्दल भुईंज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे, पोलीस हवालदार रविराज वर्णेकर व सोमनाथ बल्लाळ यांना सन्मानपत्र व बक्षीस देऊन गौरवण्यात आले. वाई ग्रामीण भागातील भुईंज पोलीस स्टेशन याच्या अंतर्गत 35 ते 40 गाव वस्त्या व वाड्या येतात अपुरे कर्मचारी असून देखील कर्मचारी उस्फूर्तपणे काम करतात. गुंडगिरी, खाजगी सावकारकी, अवैध दारू, विद्यालय व महाविद्यालयातील हुल्लडबाज  युवकांवर भुईंज पोलिसांची कडवी नजर असते. तसेच युवती किंवा महिलांच्या वरील अत्याचार रोखण्यात भुईंज पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणात यश आलेले आहे. या कामगिरीबद्दल पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी भुईंज पोलीस स्टेशनचे कौतुक देखील केले. जिल्ह्यातील भुईंज पोलीस स्टेशन,कराड शहर पोलीस स्टेशन, ढेबेवाडी पोलीस स्टेशन, औंध पोलीस स्टेशन, सायबर पोलीस स्टेशन, कोरेगाव पोलीस स्टेशन, महाबळेश्वर पोलीस स्टेशन, फलटण पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल वेगवेगळ्या प्रकारात तसेच विशेष कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा प्रशंसापत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शंभूराजे देसाई मंत्री राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा संजयसिंह येनपुरे विशेष पोलीस अधिकारी कोल्हापूर परिक्षेत्र अतिरिक्त कारभार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीमध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे, शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला