साताऱ्यात निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राजकीय वातावरण तापणार

अजित पवार, देवेंद्र फडणवीस ,शरद पवार साता-यात.

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात आज  राज्यातील प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. यामध्ये महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सभा हाेणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून सुरु असलेल्या राजकीय घडामाेडींमुळे आज साता-यात राज्यातील दिग्गज नेते काय बाेलणार, कुणावर निशाणा साधणार याची उत्सुकता मतदारांमध्ये लागली आहे.

खासदार उदयनराजे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वाई येथे सकाळी 11 वाजता जाहीर सभा होणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांचा मोठा प्रभाव असलेल्या वाई मतदार संघामध्ये अजित पवार आज काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शंभुराज देसाई यांच्या मतदारसंघात दुपारी दोन वाजता बाजार समिती मैदानावर सभा होणारअसून या सभेनंतर उपमुख्यमंत्री सातारा शहरातील तालीम संघावर जाहीर सभा घेणार आहेत.

त्याचबरोबर महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यासाठी शरद पवार यांची मागच्या पोटनिवडणुकीत झालेल्या पावसातील सभा स्थळावर होणार असून या सभेत शरद पवार मतदारांना कोणती साथ घालणार याकडे संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

या चार सभांमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण मात्र तापलेले आहे

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त