ग्रामपंचायत नांदगाव सरपंच अपाञ ठरवत पोटनिवडणूकीस हायकोर्टाची स्थगिती
सतीश जाधव
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
- बातमी शेयर करा

देशमुखनगर - मौजे नांदगाव ता.जि.सातारा येथील ग्रामपंचायत निवडणूक जानेवारी २०२१ मध्ये पार पडली. त्यानंतर सरपंच आरक्षण अनुसूचित जमाती प्रवर्गातून सौ.सारिका मोहन चव्हाण यांची सरपंच पदी निवड झाली होती.
२ वर्ष पदावर कार्यरत असताना मुदतीत जात वैधता प्रमाणपञ सादर न केल्याने जिल्हाधिकारी, सातारा यांनी दि.१९ एप्रिल २०२३ ला त्यांना अपाञ घोषित केले. त्यानंतर त्यांनी हायकोर्ट मुंबई येथे याचिका दाखल केली होती. त्या याचिकेस सौ. सुषमा राजेघोरपडे यांनी आव्हान देत लढा दिला होता. तद्नंतर राज्यपाल यांचा मुदतवाढ आदेश आल्यावर बोगस जिल्हाधिकारी आदेश व्हायरल करत गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करून शंभू महादेव पॕनलच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला होता. सरपंच यांना हायकोर्टचे कामकाजास मनाई आदेश असताना देखील त्यांनी बेधडक कामकाजात सक्रिय सहभाग नोंदवला होता. सरपंच सौ.सारिका मोहन चव्हाण यांना दि.१३ आॕक्टोबर २०२३ रोजी हायकोर्ट मुंबई यांनी अपाञ आदेश जारी करत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या दणका दिला आहे.
९ पैकी २ अपाञ व ३ राजीनामे दिल्याने ग्रामपंचायत अल्प मतात आली असून विभागीय आयुक्त, पूणे यांच्याकडे विसर्जन निर्णय प्रलंबित असताना १ सीटची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने श्री.मानाजी देशमुख यांनी हायकोर्टात राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधी याचिका दाखल केली असता दिनांक १९ आॕक्टोबर २०२३ रोजी ग्रामपंचायत नांदगाव पोटनिवडणूकीस विसर्जन /बरखास्त प्रस्तावावर निर्णय होईंपर्यंत हायकोर्ट मुंबई यांनी स्थगिती दिली असून ग्रामपंचायत नांदगावचे एप्रिल महिन्यांपासून सरपंच अभावी कामकाज ठप्प झाल्याने जिल्हा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
स्थानिक बातम्या
सातार्यातील कॅफेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; पोलिसांकडून छापे, सहा जणांवर गुन्हा दाखल
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
स्टेरॉइड’प्रकरणात मुख्य सूत्रधाराला मुंबईतून अटक, सातारा शहर पोलिसांची कारवाई
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
चुहा नही ये तो शेर है... शिवानी ताई प्रीतम कळसकर..
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
मारहाण दमदाटी शिवीगाळ प्रकरणी मोगराळे येथील सातजणांविरोधात गुन्हा दाखल.
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
तब्बल एक कोटी ९१ हजार रुपयांची बनावट विदेशी दारू जप्त करत दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
संबंधित बातम्या
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
कुडाळ बाजारपेठेमध्ये गणरायाच्या आगमनाची चाहूल, उत्सवपूर्व नियोजनांना वेग
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
कोयना धरणात व पाटण तालुक्यात पावसाची बॅटिंग सुरू
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
जावळीत पावसाने नदी नाले ओढे तुडुंब
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण झिरो बॅलन्स् खाती तात्काळ उघडून घेणेची सुविधा
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
केळवलीतील युवकाच्या खूनप्रकरणी सख्ख्या भावांना पोलीस कोठडी
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
धबधब्याचा आनंद घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्या : जितेंद्र डुडी
- Wed 25th Oct 2023 12:58 pm
-
आज पासून बदलणार सीमकार्डसंबंधीचे नियम आणि दर
- Wed 25th Oct 2023 12:58 pm