नागपुरात फडणवीस यांच्या होर्डिंग वरून अमित शहा यांचा फोटो गायब

 प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार तुझ्यापुढे आम्ही खूप खुजे आहोत तुला आमचा सलाम

देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आणि नागपूर शहराचे माजी महापौर संदीप जोशी यांनी लावलेले  होर्डिंग नागपूरला सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

 या होर्डिंग मधून देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते अमित शहा यांचा फोटो गायब आहे..

नागपूर शहरातील विविध भागांमध्ये लागलेल्या या होर्डिंग वर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी, भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, नागपूरचे विधान परिषद सदस्य आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूर शहर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि विधान परिषद सदस्य प्रवीण दटके यांचे फोटो आहेत परंतु या फोटोतून अमित शहा यांचा फोटो गायब असल्यामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आल आहे. 

होर्डिंग वर लिहिले आहे

 प्रिय देवेंद्र तू कोणत्या मातीचा बनला आहेस यार तुझ्यापुढे आम्ही खूप खुजे आहोत तुला आमचा सलाम

नागपुरातील विमानतळ परिसर, छत्रपती चौक, लक्ष्मीनगर चौकात असे होर्डिंग लागले आहेत..

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला