जाती- पातींमधील भेदभावामुळे भारत अनेक वर्षे पारतंत्र्यात : ऍड.गायकवाड

सातारा  : बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना, भारतीय स्त्रीला, श्रमिकांना व विस्थापितांना माणूस म्हणून जगण्याच्या मुख्य प्रवाहात आणले. असे प्रतिपादन माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड यांनी केले.
 तळमावले,ता.पाटण येथील काकासाहेब चव्हाण कॉलेज येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला संपन्न झाली.तेव्हा ऍड.गायकवाड मार्गदर्शन करीत होते.ते पुढे म्हणाले, "आपल्या देशाचे पुनर्निर्माण करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान व्यक्तिमत्व होते. समस्त भारतीयांचे ते प्रेरणास्रोत आहेत. गुलामगिरीत अडकलेल्या  दीन - दुबळ्या मनुष्याला न्याय मिळवून देण्याकरिता त्यांनी सदोदित संघर्ष केला. मानवजातीच्या कल्याणासाठी आपले आयुष्य वेचणारे व मानव मुक्तीचा लढा अविरत प्रज्वलित ठेवणारे  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने सर्वसामान्य गोर - गरीब, पीडितांच्या छाटलेल्या शरीराला नवे पंख मिळाले. जातीभेदामुळे भारत देश अनेक वर्षे पारतंत्र्यात गेला. बाबासाहेब आंबेडकर प्रखर बुद्धिवादी विचारवंत होते. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये पीएच.डी. पदवी मिळविली.सिम्बॉल ऑफ नॉलेज' म्हणून त्यांची जागतिक स्तरावर ओळख निर्माण झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, म. फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी थोर महापुरुषांचे कार्य एकाच जातीसाठी किंवा गटासाठी नव्हते. डॉ.आंबेडकरांचे जातिसंस्थेचे विश्लेषण आणि जातिसंस्था नष्ट करण्याचे मार्ग समजून घेणे आवश्यक आहे. त्यांनी भारतीय स्त्रीला आत्मसन्मान मिळवून द्यायला खूप मोठा लढा देऊन संघर्ष केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड कष्ट घेऊन भारताच्या आदर्श संविधानाची निर्मिती केली. संविधानामधून सत्य, न्याय, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व या तत्वांचा पुरस्कार केला."                                                           
 एस.के.कुंभार अध्यक्षीय भाषणात म्हणाले, "भारतीय संविधान प्रत्येकाने समजून घ्यावे.     स्त्री स्वातंत्र्याविषयी बाबासाहेब आंबेडकर दक्ष होते. त्यांनी  दूरदृष्टीने स्त्री हिताचे, शोषितांसाठी, कामगारांसाठी अनेक महत्वाचे कायदे केले.   बहुजनांच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले. दलित, शोषितांच्या लेखणीला प्राप्त झालेलं अभिव्यक्तीचं बळ म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत."
 सदरच्या कार्यक्रमास प्राचार्य आर.के.भोसले,मुख्याध्यापक अशोक माने,पंडित कांबळे, लक्ष्मण सुरनाथ,डॉ.व्ही.एन. शिंदे,पंचक्रोशोतील ग्रामस्थ, अध्ययनार्थी उपस्थित होते.   याकामी,गुरुदेव  कार्यकर्ते, शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अथक असे परिश्रम घेतले.  प्राचार्य डॉ. अरुण गाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. एम. बी. चव्हाण यांनी करून दिला. प्रा. सचिन पुजारी यांनी सूत्रसंचालन  केले.प्रा. डॉ. गवराम पोटे यांनी आभार मानले.

आम्हाला जोडण्यासाठी
esataranews.com

स्थानिक बातम्या

आकृतीबंधाचा शासन निर्णय  दोन वर्षांपूर्वीच  निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

आकृतीबंधाचा शासन निर्णय दोन वर्षांपूर्वीच निर्गमित होऊनही अंमलबजावणी नाही

शिक्षण प्रसारक संस्था  करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शिक्षण प्रसारक संस्था करंजे पेठ सातारा चे संस्थापक सचिव कै. साहेबराव अनंतराव पाटील यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानमाला कार्यक्रम

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

शाहुपूरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने अंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळत सहा लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल केला हस्तगत

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

गणेशभक्तांचा भावना लक्षात घेऊन रात्री बारानंतर देखील वाद्य वाजवण्यास परवानगी द्यावी

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

स्थानिक गुन्हे शाखेने 2 देशी बनावटी पिस्टल, 3 जिवंत काडतुसासह 2 लाख 25 हजाराचा मुद्देमाल केला जप्त

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या  हस्ते संपन्न...

सातारा तालुका कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन पाच वर्षाच्या निविताच्या हस्ते संपन्न...

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त