सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, सोनगाव या बंद पडलेल्या संस्थेतील ठेवी न मिळाल्याने हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी गावातच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सोनगाव  : सुवर्ण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, सोनगाव तर्फ सातारा ही पतसंस्था बंद पडून तीन वर्षे झाली तरी अद्याप ठेवीदारांच्या ठेवी त्यांना परत न मिळाल्याने हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी संचालक मंडळ आणि  प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला वैतागून सोनगाव येथीलच भैरवनाथ मंदिरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 
  संस्था बंद पडून ठेवी मिळत नाहीत. परंतु, पतसंस्थेतील संचालक मंडळ आता दमदाटी करु लागल्याने ठेवीदारांनी शासन दरबारी दाद मागितल्यानंतर शासनाकडून ही ठेवीदारांना वेठीस धरण्याचा प्रकार झाल्याने हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. जोपर्यंत आम्हाला आमच्या ठेवी मिळत नाहीत व संस्था बुडवणार्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सुरू ठेवणार असल्याचा इशारा ठेवीदार आणि ग्रामस्थांनी दिला.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला