वर्धनगड पवारवाडी येथे साथीच्या रोगाचा प्रसार, रोग आटोक्यात आल्याची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हेंद्रे यांची माहिती

 पुसेगाव : वर्धनगड पवारवाडी येथे साथीचा आजार जडला असून साडेतीनशे लोकसंख्या असलेल्या एकूण सत्तर जणावरती पवारवाडीवर उपचार सुरू असून प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉक्टर ओमकार हेंद्रे व प्राथमिक आरोग्य केंद्राची संपूर्ण टीम येथील रुग्णांना योग्य तो उपचार देत असून,यातील तीन गंभीर रुग्णांना सातारा येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओंकार हेंद्रे यांनी दिली आहे.
  खटाव तालुक्यातील वर्धनगड लगत असलेल्या पवारवाडीवर गेल्या तीन ते चार दिवसापासून साथीचा आजार सुरू झाला असून जुलाब उलट्या व पोटात दुखणे या आजाराने या पवारवाडी वरील 88 घरापैकी 77 घरामध्ये हा या साथीच्या रोगाचा प्रसार झाला असून 70 जनावर उपचार सुरू आहेत. येथील ग्रामपंचायत, तसेच मंदिरा मंदिरामध्ये रुग्णावरती उपचार सुरू असून एकूण 40 जण सलाईन वरती आहेत, सदर या रोगाबाबत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ओमकार हेंद्रे यांनी सांगितले की, हा आजार फूड पॉइझनिंग, किंवा पाण्याच्या मार्फत पसरला असून, त्यासाठी याचे स्टूल  सॅम्पल तपासणीसाठी पाठवले असून, त्याचा अहवाल उद्या 26 तारखेपर्यंत आपल्याकडे येईल, त्यानंतर समजेल की कशामुळे हा साथीचा आजार पसरला आहे,सदर हा आजार गॅस्ट्रो नसून सर्वसाधारण डायरिया पद्धतीचा आहे. सदर येथील सर्व रुग्णांवर आमचे उपचार चालू असून आम्ही पूर्णपणे लक्ष देऊन आहे, उद्यापर्यंत येथील  साथीचे रोग आटोक्यात येथील असे डॉक्टर ओमकार हेंद्रे यांनी सांगितले.

आम्हाला जोडण्यासाठी

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त