कास तलावाच्या पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण वाढले : कासचा पाणीसाठा 48 फुटांवर

कास  : सातारा शहराची पाण्याची तहान भागवणाऱ्या कास तलावाच्या पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तसेच अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी यामुळे कासमधून होणारा पाणीपुरवठा गढूळ होत अआहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अभियंता शहाजी वाठारे यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणी पातळी सहा फुटाने वाढली असून कासचा पाणीसाठा 48 फुटांवर गेला आहे.

सातारा पालिकेने पाण्याचे नमुने घेतले असून त्याची तपासणी प्रयोगशाळेत केली जाणार आहे. या संदर्भात पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता शहाजी वाठारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कास तलावाच्या पाण्यामध्ये 0.3 इतके लोहाचे प्रमाण वाढले आहे. तसेच कास परिसरात सातत्याने पाइपलाइनची कामे सुरू आहेत. कास पठारावर कधी ऊन, कधी पाऊस असे परस्परविरोधी वातावरण असल्यामुळे पाण्याला गढूळपणा प्राप्त झाला आहे. लोहाचे प्रमाण विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त झाल्यानंतर पाण्याला गढूळ रंग येतो, असे त्यांनी स्पष्टीकरण दिले
सातारा शहरात पावसाची उघडीप असली तरी कास परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे कास तलावाची पाणी पातळी सहा फुटाने वाढली असून पाणीसाठा 48 फुटांवर गेल्याचे निरीक्षण पाणीपुरवठा विभागाने नोंदवले आहे. तसेच सातारा शहराला पाणीपुरवठा करणारी पॉवर हाऊस येथील टाकी मागील महिन्यातच स्वच्छ करण्यात आली होती, अशी माहिती पाणीपुरवठा विभागातून देण्यात आली.

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

जनतेची सेवा नंतर, आधी सदस्यांच्या गाड्यांचा ‘रुबाब’ भारी! सातारा जिल्हा परिषदेत स्टिकर-बॅजची डिजिटल VIPगिरी?

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

फलटणच्या आठ बिल्डरांवर बनावट मूल्यांकन दाखल्याप्रकरणी गुन्हा; तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

सातारच्या श्रीमती अरुणा यादव -भुजबळ यांची शिक्षण उपसंचालक पदी पदोन्नती

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

राज्यात महायुती, स्थानिक पातळीवर ‘तुम्ही तुमचे, आम्ही आमचे’; शशिकांत शिंदेंचा भाजपवर हल्लाबोल

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

वाढे गावातील हॉटेलच्या बनावट ना हरकत दाखला प्रकरणाने खळबळ

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

दीर्घ व निष्कलंक सेवेची दखल; PSI रऊफ इनामदार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवापदक

संबंधित बातम्या

anandi atta chakki V
सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला