श्लोक घोरपडे एम.आर.एफ. नॅशनल डर्ट -ट्रॅक रेस मध्ये कोल्हापूर येथे 3 गटात विजेता
Satara News Team
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
- बातमी शेयर करा
सातारा : येथील शामसुंदरी चारिटेबल अँड रेलिजन सोसायटीच्या के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा वाणिज्य विभागाचा श्लोक विक्रम घोरपडे हा खेळाडू नुकत्याच कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या मोटो क्रॉस स्पर्धेत 3 गटात विजयी ठरला आहे. एम .आर. एफ. नॅशनल डर्ट ट्रॅक रेस राऊंड 2 या कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या स्पर्धेत श्लोक याने एस एक्स 1, एस एक्स 2 आणि सोळा वर्षाखालील गटांमध्ये सहभाग घेतला होता. अतिशय उत्कृष्ट प्रात्यक्षिके दाखवत त्याने या तिन्ही विभागांमध्ये प्रामुख्याने एस एक्स 2 गटात पहिला क्रमांक, सोळा वर्षाखालील गटात दुसरा क्रमांक आणि एस एक्स वन कॅटेगरीमध्ये तिसरा क्रमांक मिळवला आहे. लवकरच या स्पर्धेचा तिसरा राऊंड सातारा येथे या महिन्याच्या अखेरीस संपन्न होणार आहे. श्लोक घोरपडे हा सातारा येथील जेष्ठ उद्योजक विक्रम घोरपडे यांचा चिरंजीव असून सातारा येथील ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक व के.एस.डी. शानभाग विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे संस्थापक रमेश शानभाग यांचा नातू आहे. श्लोक याच्या या स्पर्धेतील विजयाबद्दल विद्यालयाचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विद्यालयाच्या संचालिका सौ.आचल घोरपडे, विश्वस्त सौ. उषा शानभाग, मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड ( माध्यमिक विभाग), मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी (प्राथमिक विभाग) तसेच शाळेच्या शिक्षक शिक्षिका आणि पालक संघाचे प्रतिनिधी विशेष अभिनंदन करून श्लोकला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत

स्थानिक बातम्या
पुसेसावळी दुरक्षेत्र परिसरात अवैध धंद्यांचा 'अंधार' आणि उपनिरीक्षकांची 'सुपरसोनिक' नेत्रे?
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
ड्रॅगन सोल्जर स्पोर्ट्स अकॅडमी सातारा आयोजित 7वी आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
अजिंक्यतारा किल्ल्यावर भीषण दुर्घटना; २०० फूट खोल दरीत कोसळून कामगाराचा मृत्यू
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
संबंधित बातम्या
-
महानुभाव पंथीयांच्या दक्षिण काशी फलटण येथे घोड्याची यात्रा उद्या उत्साहात संपन्न.
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
-
तळदेव येथे सामाजिक समरसता जनजागृती बैठक उत्साहात संपन्न
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
-
फलटण शहरातील दैनंदिन पाणीपुरवठ्यासाठी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर ॲक्शन मोडवर
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
-
कोळकी फलटण येथील पुलाच्या दर्जेदार कामासाठी अभिजीत निंबाळकर यांची पाहणी
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील सत्ताधाऱ्यांचा भ्रष्टाचाराचा नवा फॉर्म्युला.
- Fri 18th Aug 2023 04:19 pm
-
पुसेसावळी जिल्हा परिषद गटातील विकासकामांच्या माहिती फलकांचा अभाव : पारदर्शकतेला धक्का, नागरिकांमध्ये असंतोष.
- Fri 18th Aug 2023 04:19 pm










