खासदार विनायक राऊत यांनी दुसरा शंभूराज देसाई कोण? हे समोर आणावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे - शंभूराज देसाई
जुबेर शेख - Fri 2nd Jun 2023 07:44 pm
- बातमी शेयर करा
सातारा : शंभूराज देसाई हे आमच्या संपर्कात आहेत असं वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलं होतं.. राऊत यांनी पुरावे सादर करावे अन्यथा विधान मागे घ्यावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असे इशारा शंभूराजे देसाई यांनी विनायक राऊत यांना दिला होता.. या घटनेला दिलेला कालावधी उलटला असून विनायक राऊत यांना कायदेशीर नोटीस वकिलामार्फत देण्यात आली आहे.. दुसरे शंभूराजे देसाई कोण आहेत? असं वक्तव्य करून तो शंभूराजे देसाई एवढा मोठा कोण आहे जो उद्धव ठाकरे यांना थेट संपर्क करू शकतो याचे उत्तर विनायक राऊत यांनी द्यावे.. 25-25 वर्ष आमचा थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही विनायक राउत यांनी माघार घेतली आहे..स्वतःला कायद्यापासून वाचण्यासाठी माध्यमांच्या पुढे दुसरा शंभूराज देसाई कोण हे समोर आणावे अन्यथा राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मंत्री देसाई यांनी दिलाय..
आम्ही केलेलं काम जितेंद्र आव्हाड यांना बघवत नाही.. लोकांच्या भावना भडकवण्याचे काम अमोल मिटकरी करत आहेत
रायगड येथे शिवराज्यभिषेक दिन साजरा करण्यात आला.. आमच्या सरकारने जे चांगलं केलंय त्यापासून लोकांचं लक्ष विचलित करायचं केविलवाना प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत.. आम्ही केलेल काम हे त्यांना बघवत नसल्याचा टोला शंभूराज देसाई यांनी जितेंद्र आव्हाड यांना लगावत महाविकास आघाडीतील लोकांना कामच राहिले नाही.. उदयनराजे भोसले हे मुख्यमंत्र्यांच्या शेजारी उभे होते हे वाहिन्यांवरती दिसत होतं.. ट्विट करून लोकांच्या भावना भडकवण्याचे काम अमोल मिटकरी करत आहेत..चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनता गांभीर्याने बघत नसल्याचा सांगत अमोल मिटकरी यांच्या समाचार मंत्री देसाई यांनी घेतला आहे..
स्थानिक बातम्या
साताऱ्यात भुयारी गटार योजना वाऱ्यावर
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देणारा चरणसेवा उपक्रम
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
माथेरानला चौकशी समिती, महाबळेश्वरला मोकळे रान? शासनाच्या दुहेरी भूमिकेवर संताप
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
रयतराजच्या दणक्याने चड्डी बनियान डॉक्टर निलंबित तर दुसऱ्याची चौकशी.....
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
संबंधित बातम्या
-
फलटण शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी प्रथमच मोठा भरीव 70 कोटींचा निधी.
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
-
नगराध्यक्ष समशेरसिंह यांनी उघड केला नगर परिषदेतील कर घोटाळा, अनेक वर्षापासून सुरू होता कर घोटाळा
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
-
पालखी सोहळा स्वागतासाठी सातारा जिल्हा परिषद सज्ज- डॉक्टर प्रियाताई शिंदे
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm
-
कसं काय पाटील बर हाय का विधानसभेत जे ऐकले ते खर आहे का? ॲड. संदीप कांबळे.
- Fri 2nd Jun 2023 07:44 pm












