राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे शहर शिवसेनेमध्ये चलबिचल

 दहा पदाधिकारी  वाटेवर 

सातारा  ; सातारा शहर कार्यकारिणीचे तब्बल दहा पदाधिकारी राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असून त्यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्धार केल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यांच्या राजीनाम्याच्या पवित्र्यामुळे शहर कार्यकारणी मध्ये खळबळ उडाली असून या कार्यकारणीचे डॅमेज कंट्रोल नक्की कोण करणार याविषयी संभ्रमावस्था आहे 

 

राज्यात नाट्यमय घडामोडीनंतर सत्तापालट होऊन शिंदे गट आणि भाजपा युतीचे सरकार स्थापन झाले आहे त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साताऱ्यातील कट्टर समर्थक निलेश मोरे यांना शिवसेनेने बाहेरचा रस्ता दाखवला आहे मात्र गटाने आपलीच शिवसेनाही मूळ असल्याचा दावा केल्याने शिंदे समर्थक गट आणि उद्धव ठाकरे समर्थक गट अशा दोन गटांमध्ये कार्यकर्ते विभागले गेल्याने संभ्रमावस्था वाढली आहे . तशातच सातारा शहर कार्यकारणी मध्ये सुद्धा प्रचंड अस्वस्थता आहे सातारा शहर संघटक अमोल इंगोले,उपशहरप्रमुख अभिजीत सपकाळ ,उपशहरप्रमुख सयाजी शिंदे, विभाग प्रमुख अमोल खुडे ,उपविभाग प्रमुख म्हणून मनोज भोसले, शाखा क्रमांक एक पंतचा गोट येथील शाखाप्रमुख अमोल पवार, उपशाखाप्रमुख प्रथमेश बाबर, बुथ प्रमुख आसीफ फकीर, प्रभाग क्रमांक पाच मधील विभाग प्रमुख सुमित नाईक सदर बझार येथील उपविभागप्रमुख रजत नाईक या दहा कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा राजीनामा देऊन शिंदे गटाला समर्थन देण्याची तयारी चालवली आहे

 त्यामुळे सातारा शहर कार्यकारणी मध्ये खळबळ उडाली असून या कार्यकारणीचे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कोणी पुढे येईना असे झाले आहे . ठाणे तसेच मराठवाडा ठिकाणीसुद्धा शिवसेनेच्या राजीनामा सत्रामुळे शिवसैनिक संभ्रमित झाला आहे त्या राजीनाम्याचे लोन सातारा शहरात पसरले असून तब्बल दहा शिवसैनिक शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्यामुळे त्यांना नक्की रोखायचे कसे आणि कोणी याविषयी कोणीही जबाबदार वाणीने बोलायला तयार नाही .

 सातारा विधानसभा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष यशवंत घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले युवा सेना प्रमुख रणजीत भोसले यांच्याकडे आहे त्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालायला हवे . शिवसेनेच्या वरिष्ठ कार्यकारणी तुम्ही असल्यामुळे माझा त्या प्रकरणाची थेट संबंध येत नाही यासंदर्भात मुख्यमंत्री गटाचे कट्टर समर्थक निलेश मोरे बोलताना म्हणाले साताऱ्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही जिल्हा कार्यकारणी चे आणि शहर कार्यकारणी मध्ये कधीही वितंडवाद नव्हता मात्र तरीही शहर कार्यकारणी च्या सदस्यांना कधीही बळ दिले जात नव्हते त्यामुळे कदाचित त्यांनी राजीनाम्याचा पवित्रा घेतला असेल हा त्यांचा व्यक्तिगत निर्णय चा भाग आहे पण त्यांची येण्याची इच्छा असेल तर त्यांचे शिवसेनेत स्वागतच आहे आम्ही कोणीही शिंदे गट किंवा उद्धव ठाकरे गट असा कोणताही गट मानत नाही आजही शिवसेना अभंग आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेचे वाटचाल आणि सातारा शहर तसेच जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न सोडवण्याचे काम आहोरात्र सुरूच राहील असे निलेश मोरे यांनी स्पष्ट केले

आम्हाला जोडण्यासाठी

स्थानिक बातम्या

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

रचना प्रॉपर्टी एक्‍स्‍पो 2024चे शानदार उद्घाटन संपन्न.... विविध मान्‍यवरांची उपस्‍थिती

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद जवान शुभम घाडगे यांच्या पार्थिवावर कामेरी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या   शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

उद्या पुसेगाव बैलगाडी शर्यती धावणार 1199 बैलगाड्या शर्यतीच्या पारदर्शकतेसाठी ऑनलाईन लॉट्स पाडले जाणार

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

कोळकी ग्रामपंचायत मध्ये राजे गटाला दुसऱ्यांदा खिंडार.

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

'श्रीपतराव पाटील हायस्कूल' व 'आदर्श विद्यामंदिर'च्या विद्यार्थ्यांनी भरवला आठवडी बाजार

संबंधित बातम्या

सुयोग डेव्हलपर्स
छ.शिवाजी महाराज यांच्या वरील आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणातील खरा दोषी पोलिसांकडून गजाआड
सातारा चे नाव पुन्हा एकदा सात समुद्रपार
चाऱ्याचे पैसे परत मागितल्याच्या रागातून महिलेला भर चौकात मारहाण
ठोसेघर धबधबा फेसाळला
मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांची घोषणा होताच गोव्यात बंडखोर आमदारांचा नाचीन आनंद व्यक्त