जावळीचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला दोन टप्प्यात निधी देऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पत्रकार संघ जावळीच्या पत्रकारांनी पुकारलेल्या आंदोलनाला यशSatara News Team
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
- बातमी शेयर करा
जावळी : जावळी तालुक्याचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांच्या गावी हुतात्मा स्मारक व्हावे यासाठी जावळी पत्रकार संघ जावळी संघाच्या पत्रकार सदस्यांनी स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट ला स्मारकासाठी निधी मिळावा म्हणून आणि स्मारक लवकर व्हावे म्हणून आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र आंदोलनाची दखल घेत जावळी साताऱ्यासह संपूर्ण प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली व सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणारे महाबळेश्वर जावळी तालुक्याचे सुपुत्र यांनी या आंदोलनाची दखल घेत पत्रकार संघ जावळी पत्रकार सदस्यांना चर्चेचे निमंत्रण दिले यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जावळीचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाच्या बाबत त्वरित हालचाल व्हावी व स्मारकासाठी निधी उपलब्ध होऊन लवकरात लवकर स्मारक उभे रहावे यासाठी पत्रकार संघ जावळीच्या सदस्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली व या बाबत चर्चा देखील केली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष वसीम शेख कार्याध्यक्ष सादिक सय्यद सचिव विनोद वेदे उपाध्यक्ष संतोष बेलोसे सुजित धनवडे बापू वाघ मोहसीन शेख , जुबेर शेख विशाल जमदाडे महेश बारटक्के संतोष बेलोसे सादिक सय्यद संतोष मालुसरे शहाजी गुजर आधी सदस्य यावेळी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करताना उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जावळी तालुक्यात केडंबे या गावी स्मारक होण्याच्या संदर्भात तांत्रिक माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष वसीम शेख व कार्याध्यक्ष सादिक सय्यद यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडली त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थित असणाऱ्या जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांना याबाबत तात्काळ निधी उपलब्धतेसाठी प्रस्ताव तयार करून यावर तातडीने ठोस उपाय योजना व्हावी असे आदेश देखील दिले दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या जवळच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी देखील पत्रकार संघ जावळीच्या सदस्यांनी केलेल्या मागणीला दुजोरा दिला व याबाबत यापूर्वी शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी आपण प्रस्ताव पाठवले आहेत मात्र पत्रकार संघ जावळीच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याला अभिनंदन करत त्यांनी देखील या मागणीला दुजोरा दिला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे तहसील कार्यालयामध्ये स्मारका बाबत आदेश देखील पारित करण्यात आले असून लवकरात लवकर शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकाला निधी उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आदेशाला प्रमाण मानून पत्रकार संघ जावळीच्या सदस्यांनी 15 ऑगस्ट रोजी चे आंदोलना तहसीलदार कोळेकर यांना भेटून स्थगिती दिली यावेळी पत्रकार संघ जावळीचे मार्गदर्शक इम्तियाज मुजावर सर्व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते
स्थानिक बातम्या
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
फलटण शहरचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची तडकाफडकी बदली
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
संबंधित बातम्या
-
फलटण तालुक्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट आता होणार प्रबळ दावेदार.
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
-
फलटण पंचायत समिती सदस्य पदासाठी सांगवी गणातून सौ .सारिका संजय सोडमिसे प्रबळ दावेदार.
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
-
शिक्षण प्रसारक संस्थेचा पूरग्रस्त विद्यार्थ्यांना मदतीचा हात..
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
-
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धिरेंद्रराजे खर्डेकर यांची राजकीय भेट
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
-
औंध महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न.
- Mon 14th Aug 2023 09:40 pm
-
फलटण येथील गणेश मूर्ती विटंबनेप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद करा .
- Mon 14th Aug 2023 09:40 pm








